एक्स्प्लोर

लोकसभेच्या 45 तर विधानसभेच्या 200 जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट, बावनकुळे यांची माहिती

Lok Sabha Election 2024: गेल्या काही महिन्यात राज्यभर ‘धन्यवाद मोदीजी लाभार्थी संपर्क अभियान’ राबवले जात आहे.

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule ) यांनी मंगळवारी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव संदीप लेले आदी याप्रसंगी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule ) म्हणाले की, गेल्या काही महिन्यात राज्यभर ‘धन्यवाद मोदीजी लाभार्थी संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानात मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे पाठवली जात आहेत. फ्रेंड्स ऑफ बीजेपी सारख्या उपक्रमातून भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी सहमत असणार्‍या तसेच पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्‍वास असणार्‍या समाजातील मान्यवरांना पक्ष संघटनेशी जोडले जात आहे. संपूर्ण राज्यभर बूथ पातळीपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.

मोदी सरकारने गरीब कल्याणच्या अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर देशाला सामर्थ्यशाली, समृद्ध बनवण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांना यश मिळत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मोदी सरकारप्रमाणेच विविध समाजसघटकांच्या कल्याणाच्या योजना आखत आहे. अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महविकास आघाडी सरकारने जनकल्याणाची कोणतीच कामे केली नाहीत. ‘फेसबुक लाईव्ह सरकार’ जावून आता कार्यक्षम सरकार आले आहे. या सरकारने शेतकर्‍यांना 7 हजार कोटींची मदत केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात घेतले आहेत, असे बावनकुळे यांनी नमूद केले.

केंद्र आणि महाराष्ट्रात डबल इंजिनाच्या सरकारमुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवली जातील, त्याचबरोबर संघटन मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासह 45 पेक्षा अधिक जागा तर विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आम्ही साध्य करू, असा विश्‍वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचायला विसरु नका:
Ambabai Mandir Kolhapur Latest News Update : अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांची कुचंबणा; आधी रांगेतून दर्शन मग स्वच्छतागृह शोधण्यासाठी पायपीठ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Helicopter Crash : पुणे हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणी, आमदार Sangram Thopte यांची प्रतिक्रियाHelicopter Crash : Sunil Tatkare यांना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलंPune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
Embed widget