एक्स्प्लोर
कर्नाटकात कमळ कोमेजलं, पोटनिवडणुकीत भाजपविरोधी वारे
बल्लारी लोकसभा मतदारसंघ कुख्यात खाणसम्राट रेड्डी बंधूंचा बालेकिल्ला. त्यांचा अनुयायी श्रीरामुलू विधानसभेवर निवडून गेल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे व्ही.एस.उग्राप्पा यांनी पाच लाख 88 हजार मते मिळवत रेड्डींच्या नातेवाईक जे. शांता यांना पराभूत केलं.
मुंबई : कर्नाटकातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल भाजपला हादरवणारे आहेत. पाचपैकी तीन जागी काँग्रेस-जनता दल धर्मनिरपेक्ष युतीचा विजय झाला, तर भाजपाला फक्त एका जागी विजय मिळवता आला. त्यातही भाजपच्या उत्तर कर्नाटकच्या बालेकिल्ल्यातील जमखंडी राखतानाच काँग्रेसने बेल्लारी या रेड्डीबंधूंच्या बालेकिल्ल्यात मिळवलेला विजय राज्यातील वारं भाजपाविरोधात वाहू लागल्याचे संकेत देणारे असल्याचे म्हटलं जात आहे.
एकाच वर्षात वारं बदलू लागलं आहे.. काँग्रेसच्या हाताला साथ मिळत आहे, जनता दलावर विश्वास वाढत आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसला मागे सारत क्रमांक एकच्या जागा मिळवल्या होत्या. मात्र अवघ्या चार महिन्यांनी लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन अशा पाच मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या आणि भाजप मागे फेकली गेली.
बालेकिल्ल्यातच भाजपला धक्का
बल्लारी लोकसभा मतदारसंघ कुख्यात खाणसम्राट रेड्डी बंधूंचा बालेकिल्ला. त्यांचा अनुयायी श्रीरामुलू विधानसभेवर निवडून गेल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे व्ही.एस.उग्राप्पा यांनी पाच लाख 88 हजार मते मिळवत रेड्डींच्या नातेवाईक जे. शांता यांना पराभूत केलं. मंड्या मतदारसंघात जनता दल धर्मनिरपेक्षचे एल आर शिवरामगौडा यांनी चार लाख 94 हजार मते मिळवत भाजपच्या डॉ. सिद्धारामय्या यांना अस्मान दाखवले.
माजी मुख्यमंत्री बी.ए.येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याने रिकामा झालेला शिवमोंगा या मतदारसंघाने मात्र भाजपची अब्रू राखली. तेथे येदियुरप्पा पुत्र बी.वाय.राघवेंद्र यांनी पाच लाख 43 हजार मतांसह बाजी मारली. मात्र मताधिक्य 52 हजारांवर घसरले. विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. त्यातील जामखंडी मतदार संघातील काँग्रेस आमदाराच्या अपघाती मृत्यूनंतर तेथे पोटनिवडणूक होती. मात्र काँग्रेसच्या आनंद न्यामगौडा यांनी 97 हजार मतांसह भाजपच्या श्रीकांत कुलकर्णींना दणक्यात घरी बसवले. या विजयाचं वेगळं महत्व आहे.
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा बालेकिल्ला असलेल्या रामनगरमध्ये त्यांच्या पत्नी अनिता यांनी जनता दल धर्मनिरपेक्षला एक लाख 25 हजार मतांसह दणदणीत विजय मिळवला. तशीही ऐन मतदानाआधी उमेदवार एल.चंद्रशेखर भाजपसोडून काँग्रेसच्या स्वगृही परतल्याने ही निवडणूक एकतर्फी झाली. तरीही कमळाच्या चिन्हामुळे त्यांच्या नावावर 15 हजार मते जमा झालीच.
कुमारस्वामी यांनी केलेली पुढची निवडणूक लोकसभेची असल्याने काँग्रसच्या नेतृत्वाखालीच लढवण्याची घोषणा महत्वाची आहे.
कुमारस्वामींची भूमिका परिपक्व राजकारणाचे संकेत देणारी आहे. जर भाजपविरोधक एकत्र लढले, तर त्यांना फायदाच होतो आणि भाजपचा अश्वमेध रोखला जाऊ शकतो, हे उत्तर प्रदेशानंतर आता दक्षिणेतील कर्नाटकानंही दाखवून दिलं आहे. प्रश्न एवढाच की ही एकी 2019 च्या रणसंग्रामापर्यंत टिकणार का?
कर्नाटकात कमळ कोमेजलं...
लोकसभा पोटनिवडणुका
बल्लारी
काँग्रेस व्ही. एस. उग्राप्पा (विजयी) 5,88,863
भाजप जे. शांता (पराभूत) 3,60,608
मंड्या
जनता दल (ध) एल आर शिवरामगौडा (विजयी) 4,94,728
भाजप डॉ. सिद्धरामय्या (पराभूत) 2,05,357
शिवमोंगा
भाजप बी. वाय. राघवेंद्र (विजयी) 5,43,306
काँग्रेस व्ही. एस. उग्राप्पा (पराभूत) 4,91,158
विधानसभा पोटनिवडणुका
रामनगरम
जनता दल (ध) अनिता कुमारस्वामी (विजयी) 1,25,043
भाजप एल. चंद्रशेखर (पराभूत) 15,000
जमखंडी
काँग्रेस आनंद न्यामगौडा (विजयी) 97,013
भाजप श्रीकांत कुलकर्णी (पराभूत) 57,529
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement