एक्स्प्लोर

Karnataka Election: मुख्यमंत्रीपदासाठी डीके शिवकुमार, सिद्धारमय्या यांच्यासोबत आता मल्लिकार्जुन खर्गेही शर्यतीत, अनपेक्षितपणे नाव आलं पुढे

Karnataka Election Result : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव अनपेक्षितपणे पुढे आलं आहे. 

Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून आता मुख्यमंत्रीपदी कोण होणार याकडे लक्ष लागलं आहे. कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव अचानक पुढे आलं आहे. 

निवडणुकीच्या आधी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे या निवडणुका माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता बहुमत आल्यानंतर या दोघांपैकीच कोणीतरी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण आता अचानक या शर्यतीमध्ये आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील स्पर्धेत आले आहेत. तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते जी परमेश्वर यांचं नावदेखील चर्चेत आहे. 

दुसरीकडे बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतिश जारकीहोळी यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचंही नाव अनपेक्षितपणे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष असून ते काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांनाही पसंती मिळू शकते.

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

मल्लिकार्जुन खर्गे  

- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष.
- विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून कारकीर्द  सुरु.
- 1969 पासून काँग्रेससोबत.
- गांधी कुटुंबियांचे विश्वासू.
- 1999, 2004 आणि 2013 अशी तीनवेळा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली.
- नऊ टर्म आमदार, दोन टर्म खासदार.
- डॉ. मनमोहन सरकारमध्ये केंद्रीय मंत्री.

सिद्धरामय्या

- जनता दल, जेडीएस ते काँग्रेस असा राजकीय प्रवास.
- 2005 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय. 
- 2013 ते 2018 कर्नाटकचे मुख्यमंत्री.
- दलित, मुस्लीम मतदारांमध्ये प्रसिद्ध.
- मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार.

डी के शिवकुमार

- कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.
- काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख.
- 7 टर्म आमदार.
- 2013 ला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत.
- देशातल्या सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक.
- अहमद पटेलांच्या राज्यसभा विजयात मोठा वाटा.
- 2018 साली सरकार वाचवण्यात मोठी भूमिका.
- संघटन कौशल्यामुळे देशात चर्चेत.
- 2019 भ्रष्टाचारप्रकरणी अटक.
- मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार.

जी परमेश्वर

- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते.
- पाच टर्म आमदार.  
- कुमारस्वामी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री.
- 2013 मध्येही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार.
- 2015 ते 2017 कर्नाटकचे गृहमंत्री.
- कर्नाटक काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्ष.
- स्वताची मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी.
 
ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget