(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकसाठी भाजप सज्ज; सहा दिवस 22 रॅली, स्टार प्रचारकांची फौज, पंतप्रधानांच्या सभांचा धडाका
Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक निवडणुकांचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने भाजपतर्फे एकही संधी सोडली जात नाही.
Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा त्या ठिकाणच्या राजकीय हालचाली वाढत आहेत.
केंद्रात पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी सहा दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सभांना उपस्थित राहणार आहेत.
कर्नाटक निवडणुकांचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने भाजपतर्फे एकही संधी सोडली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा दिवसाच्या या दौऱ्यात प्रचारासाठी भाजपच्या बड्या प्रचारकाची फौज उतरणार आहे. आपल्या प्रत्येक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन रॅलींना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी उतरल्यामुळे मोठा प्रभाव पडणार आहेत. जेथे पक्षाचा जनाधार कमी आहे, अशा मतदारसंघांवर विशेष भर देण्यात येणार आहे. दिग्गजांची मोठी फौज प्रचाराच्या मैदानात भाजपने उतरवली जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटक दौरा पुढीलप्रमाणे
- 29 एप्रिल - हुमनाबाद, विजयपुरास कुडची आणि बंगळूरूच्या उत्तर भागात रॅलींना उपस्थित राहणार आहेत.
- 30 एप्रिल - कोलार, चन्नपट्टना आणि बेलूर
- 2 मे - चित्रदुर्ग, विजयनगरा, सिंधानपूर आणि कलबुर्गी
- 3 मे - मुदाबिद्री, करवार आणि किट्टूर येथे सभा होणार आहे
- 6 मे - चित्तापूर, नंजांगुड, टुमकुरु ग्रामीण, बंगळूरूचा दक्षिण भाग
- 7 मे - प्रचाराचा शेवटचा दिवस चार रॅलींना संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा 7 मे ला शेवटचा दिवस आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चार सभांना संबोधित करणार आहेत. बदामी, हावेरी, शिवमोगा ग्रामीण आणि बंगळूरू सेंट्रल येथे रॅली होणार आहे.
कर्नाटकच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे . भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे . कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपले कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं असून केंद्रीय नेतृत्वाने स्वतः या ठिकाणी लक्ष घातल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बीएस येडियुराप्पा यांनी नुकतंच सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.