एक्स्प्लोर

Kankavli Assembly Constituency 2024 : कणकवली मतदारसंघात नितेश राणेंचा दणक्यात विजय; तर, संदेश पारकर यांचा पराभव

Kankavli Assembly Constituency 2024 : कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार निश्चित असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून संदेश पारकर हे उमेदवार आहेत.

Kankavli Assembly Constituency 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आज (23 नोव्हेंबर) 288 विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे यांचा विजय झाला आहे. तर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून संदेश पारकर यांचा पराभव झाला आहे.  या मतदारसंघाची निवडणूक खऱ्या अथनि लक्षवेधी ठरली आहे.

नितेश राणे हे 2014 पासून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यावेळी झालेल्या पंचरंगी निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नितेश राणे यांनी सुमारे 75 हजार मते घेत जवळपास 26 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपचे उमेदवार प्रमोद जठार यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असताना कणकवली विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी देवून रिंगणात उतरवले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्यासाठी मतदारसंघात सभा घेवून ताकद दिली होती तर राणेंशी राजकीय शत्रुत्व असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सतीश सावंत यांच्यासाठी कणकवलीत खास प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी दोन्ही बाजूने विजयासाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबवण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या लढतीत कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांनी 28 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवत सिंधुदुर्गात भाजपचे खाते खोलले होते. त्यावेळी नितेश राणे यांना तब्बल 84 हजार 504 मत मिळवत शिवसेनेचे सतीश सावंत पराभव केला होता.

आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता राजकीय समीकरणे खूप बदलली आहेत, गेल्या 5 वर्षात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या मतदारसंघावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. 

राजकीय बलाबल पाहता काँग्रेसच्या तुलनेत उबाठा शिवसेनेची ताकद अधिक आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी चांगली लढत दिली होती. त्यामुळे ठाकरे शिवसेना या मतदारसंघात दावा करणार हे निश्चित आहे. ठाकरे शिवसेनेकडून मागील विधानसभा लढवलेले कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, या मतदारसंघाचे संपर्कप्रमुख अतुल रावराणे आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी सुशांत नाईक यांनी गेल्या वर्षभरापासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघात रोजगाराचा आणि पाण्याचा प्रश्न आहे. रोजगाराच्या शोधात या भागातून मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यासारख्या शहरात अनेक कुटुंब गेल्याचं पाहायला मिळत आहे. नाणार रिफायनरीचा प्रकल्प रखडल्याने रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघात आनंदवाडी प्रकल्प गेले अनेक वर्ष रखडलेला आहे. सोबतच पर्यटनाला देखील चालना मिळणं गरजेचा आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मानला जाणारा करूळ घाट गेले दहा महिने बंद असल्याने या निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा असणार आहे. 

नितेश राणे हिंदूंचे गब्बर म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण करत असले तरी देखील त्यांच्याच मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार देखील आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget