एक्स्प्लोर

सेल्फीसाठी धडपड करणाऱ्या कार्यकर्त्याने ज्योतिरादित्य शिंदेंना पराभूत केले!

अशा मजबूत गड असलेल्या गुनामधून कृष्ण पाल यादव यांनी विजय मिळवला आहे. सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये कृष्ण पाल यादव कारच्या बाहेरून शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत.

गुना: काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या के. पी यादव यांनी त्यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला. हे के पी यादव हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे खास कार्यकर्ते मानले जायचे. ज्योतिरादित्य यांच्यासोबत सेल्फी काढतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच के पी यादव यांनी शिंदे यांचा गड असलेल्या गुनामधून त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या मतदारसंघात शिंदे घराण्याच्या तीन पिढ्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे आजी विजयराजे शिंदे 6 वेळा तर वडील माधवराव शिंदे 4 वेळा इथून खासदार राहिले आहेत. तर स्वतः ज्योतिरादित्य 4 वेळा गुना लोकसभा क्षेत्रातून खासदार राहिले आहेत. अशा मजबूत गड असलेल्या गुनामधून कृष्ण पाल यादव यांनी विजय मिळवला आहे. सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये कृष्ण पाल यादव कारच्या बाहेरून शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. यादव हे शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जायचे. ज्योतिरादित्य यांच्या निवडणूक आणि प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. गेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना तिकीट दिले जाणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला गेल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. ही उमेदवारी दिल्यानंतर शिंदे पत्नी प्रियदर्शनी यांनीच शिंदे गाडीमध्ये बसलेले असताना केपी यादव हे सेल्फी घेण्याची धडपड करत असतानाचा एक फोटो सोशल मीडियात टाकला होता. प्रियदर्शनी यांनी 'जो व्यक्ती महाराजांसोबत सेल्फी धडपडायचा, त्याला भाजपने तिकीट दिलंय' अशी टीकाही केली होती. आता ज्यावेळी एक लाखांहून अधिक मतांनी यादव विजयी झाले आहेत, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाच फोटो व्हायरल करायला सुरुवात केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget