एक्स्प्लोर

Jayashree Thorat : वर्षाभराच्या लेकाला घरी ठेवून बापासाठी जयश्री थोरात प्रचाराच्या मैदानात! भावूक होऊन म्हणाल्या...

Jayashree Thorat :  बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत.

Jayashree Thorat :   राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) प्रचाराचा सपाटा सुरु आहे. अवघ्या काही दिवसांतच राज्याच्या राजकारणाचं पुढच्या पाच वर्षांचं चित्र स्पष्ट होईलच. पण त्याआधी मतदारांमध्ये प्रभाव पाडण्यासाठी प्रचारांचे दौरे सुरु आहेत. बहिण भावासाठी, लेक बापासाठी, आजोबा नातवासाठी, बाप लेकीसाठी अशी सगळीच मंडळी प्रचाराचं मैदान अगदी धुवून काढतायत. त्यातच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) या देखील त्यांच्या वर्षभराच्या लेकाला घरी ठेवून प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. एबीपी माझासोबत संवाद साधताना जयश्री थोरातांनी भावूक होत प्रतिक्रिया दिली आहे. 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात आठ वेळा निवडून येत विक्रम केला आहे.यावेळी नवव्यंदा ते निवडणुकीला सामोरे जात असून तालुक्याबरोबर राज्याचा दौरा देखील त्यांना करावा लागतोय.बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी त्यांचं कुटुंब देखील मतदार संघात दौरा करतंय. जयश्री थोरात या देखील आपल्या वर्षभराच्या मुलाला घरी ठेवून वडिलांसाठी मतदार संघात भेटीगाठी आणि संपर्क अभियान राबवत आहे.संगमनेर तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जात मतदारांशी संवाद साधत जयश्री थोरात आपल्या वडिलांच्या मताधिक्यासाठी प्रयत्न करत आहे.

माझा लेक मला माफ करेल - जयश्री थोरात

एबीपी माझासोबत संवाद साधताना जयश्री थोरात यांनी म्हटलं की,संगमनेर तालुका थोरात साहेबांचा परिवार आहे. पूर्ण तालुका एकजूट झाला असून मतदारांनीच थोरात साहेबांसाठी प्रचाराची मोहीम हाती घेतलीये. एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचं मला दिसून येतंय. मी रोज सकाळीच बाहेर पडते आणि रात्री उशीरा जाते. त्यामुळे मुलाची भेट होत नाहीये. त्याची आठवण येतेय. पण आता आठवडाच राहिलाय. त्यानंतर पूर्णवेळ त्यालाच देणार आहे. यासाठी तोही मला माफ करेल. 

पुढे त्यांनी म्हटलं की, लोकसभेत पराभव दिसल्यानंतर लाडकी बहीण योजना आणण्यात आली. यांचं हिताचं नव्हे तर मताचं राजकारण आहे, हे आता महिलांना देखील समजून आलंय. त्यामुळे त्याचा प्रभाव मतदारांवर पडणार नाही. जे सरकार महिलांचा अपमान होऊ देतं, अत्याचार होऊ देतं, त्यांच्या सुरक्षेला  केवळ 1500 रुपये देऊन चालणार नाही.                   

ही बातमी वाचा : 

Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओचा दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओचा दाखवला
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
Nashik Weather Update : मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 06 March 2025Gunaratna Sadavarte on Marathi : राज ठाकरेंच्या औलादी कुठे शिकल्या?भाषा सक्ती हा मुघली विचारAbu Azmi EXCLUSIVE : शिवरायांबद्दल वादग्रस्त बोललो नाही, सॉरी बोलणार नाही: अबू आझमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओचा दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओचा दाखवला
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
Nashik Weather Update : मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
Chine Budget : चीनच्या सुरक्षा बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ, भारतासाठी धोका का आहे? चार मोठी कारणे  
चीनच्या सुरक्षा बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ, भारतासाठी धोका का आहे? चार मोठी कारणे  
Jaykumar Gore : इकडं हक्कभंग आणला, तिकडं जयकुमार गोरेंविरोधात आणखी एक महिला दोन दिवसांत पुराव्यानिशी समोर येणार, पीडित महिलेच्या दाव्याने खळबळ!
इकडं हक्कभंग आणला, तिकडं जयकुमार गोरेंविरोधात आणखी एक महिला दोन दिवसांत पुराव्यानिशी समोर येणार, पीडित महिलेच्या दाव्याने खळबळ!
भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रात मराठीच
भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रात मराठीच
Satish Bhosale & Suresh Dhas : सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
Embed widget