एक्स्प्लोर

मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार

लोकसभेला आम्हाला झालेलं मतदान हे मोठं आहे. त्यामुळे, महायुतीला विधानसभेला 170 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय.

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतदेखील संपुष्टात आली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष असला तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे. लोकसभेला महाराष्ट्रात नरेटीवमुळे आमचं मोठं नुकसान झालं, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं. तसेच, विधानसभा निवडणुकीत महायुतीला किती जागांवर विजय मिळणार हेही भाकीत त्यांनी केलंय. तसेच, एबीपी माझाच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) रामदास आठवलेंसारखं मंत्री व्हायचं झाल्यास मी माझा पक्ष बंद करेन असे म्हटले होते. त्यावर, रामदास आठवलेंनीही पलटवार केला आहे, मी आता मंत्री आहे, राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा, असे आठवले यांनी म्हटले 

लोकसभेला आम्हाला झालेलं मतदान हे मोठं आहे. त्यामुळे, महायुतीला विधानसभेला 170 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. RPI ला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती. मात्र, मी ती दूर केली आहे. विधानसभेला जरी आम्हाला एक जागा असेल तरी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचं आश्वासन फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्याचे देखील  रामदास आठवले यांनी सांगितले.

राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा

राज ठाकरे म्हणाले पक्ष बंद करेन, या विधानावरही रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. माझ्यासारखा माणूस त्यांच्या पक्षात जाणार नाही. मी पँथर काळापासून संघर्ष केला आहे, त्यामुळं मला मंत्रिपद मिळाल आहे. राज ठाकरे यांना बोलू द्या, असेही आठवले यांनी म्हटले. तसेच, माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, आता मी मंत्री झालोय तर राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष बंद करावा, असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला.

अरविंद सावंत यांच्यावर कारवाईची मागणी

अरविंद सावंत हे तसे चांगलं कल्चर असलेले खासदार आहेत. शायना एन सी यांना माल म्हणणे ही गंभीर बाब आहे. त्यांचा अपमान म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे, अशा शब्दात रामदास आठवले यांनी शिवसेना युबीटी नेते अरविंद सावंत यांच्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी, सोबतच महिला आयोगाने देखील याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

उमेदवारांच्या वाढत्या संपत्तीबाबत परखड भाष्य

दरम्यान उमेदवारांच्या व नेत्यांच्या वाढलेल्या संपत्तीबाबत देखील आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली. संपत्ती ही लिमिटेड असावी, ती फार वाढावी या मताचा मी नाही. पण जर ते लोक एखाद्या व्यवसायात उतरले तर त्यांची संपत्ती वाढते, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा

एन्काऊंटर स्पेशालिस्ट, नाव बुलेट पाटील; नवाब मलिकांविरुद्ध लढणारा महायुतीचा उमेदवार कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar vs Raosaheb Danve : नाव नं घेता सत्तारांचा दानवेंना इशाराRashmi Shukla Maharashtra : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आक्रमकPriyanka Chaturvedi : सत्ताधाऱ्यांच्या संपत्तीवर प्रियंका चतुर्वेदींचं बोटABP Majha Headlines :  7 PM :  1 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Mallikarjun Kharge : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
Girish Mahajan : एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
Embed widget