एक्स्प्लोर

निवडणुकीच्या काळात किती रोख रक्कम जवळ ठेवता येते? निवडणूक आयोगाची काय आहे मर्यादा? 

निवडणुकीच्या (Election) काळात सर्वानांच एक प्रश्न पडतो. तो म्हणजे या काळात आपण सोबत किती रोख रक्कम ठेऊ शकतो. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

Loksabha Election cash carry News : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)  रणसंग्राम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. काही ठिकाणचे सोडले तर जवळपास सर्व ठिकाणचे उमेदवार देखील निश्चित झाले आहे. दरम्यान या निवडणुकीच्या (Election) काळात सर्वानांच एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे या काळात आपण सोबत किती रोख रक्कम ठेऊ शकतो. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगानं (Election commission) सोबत पैसे ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

निवडणुकांच्या काळात पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर 

निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला दिसतो. तसेच या काळात जास्त रक्कम ठेवल्याबद्दल कारवाई देखील होते. या काळात पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोग काही मर्यादा घालून देते. या मर्यादेच तुम्हाला रोख रक्कम जवळ बाळगावी लागते, अन्यथा तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते. 

 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम असल्यास कागदपत्रे दाखवावी लागणार

सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे. येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसहिंता राज्यात लागू करण्यात आली आहे. आचारसहिंताचे नियम केवळ उमेदवारांसाठीच नाहीतर राज्यातील सामान्य जनतेसाठी देखील आहेत. यामध्ये तुम्ही जवळ किती रोख रक्कम ठेऊ शकता किंवा किती रुपयांचे दागिणे सोबत ठेऊ शकता यावर मर्यादा घालण्यात आली आहे. निवडणूक आोगाच्या नियमानुसार तुम्ही  50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम किंवा 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू असल्यास, तुम्हाला कागदपत्रे दाखवावी लागतील. अन्यथा तुमची रक्कम जप्त केली जाईल. 

जप्त केलेली रक्कम परत मिळू शकते का?

दरम्यान, एखादा व्यवसाय करणारी व्यक्ती स्वत:जवळ जास्त रक्कम ठेऊ शकते. मात्र, त्या व्यक्तिला व्यवसायासंदर्भात पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. तुमच्या संपूर्ण व्यवहाराची नोंद असणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुमची चौकशी केली तरी तुम्हाला योग्य माहिती देता येईल. दरम्यान, तपासादरम्यान, तुमच्याकडे जर मर्यादेपेक्षा अधिक रक्कम मिळाली तर तुमची रक्कम जप्त होते. मात्र, ही रक्कम तुम्हाला परत मिळते का? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. तर याचे उत्तर होय असे आहे. ताकण तुम्ही जर योग्य ती कागदपत्रे सादर केली तर तुमची रोख रक्कम परत मिळू शकते. 

महत्वाच्या बातम्या:

Loksabha Election 2024: कोणताही उमेदवारी पैसे वाटत असल्यास फक्त एक फोटो पाठवा, निवडणूक आयोग तुमचं लोकेशन स्वत: शोधून काढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget