Grampanchayat : राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान, थेट सरपंच पदासाठीही निवडणूक होणार
Grampanchayat Elections : राज्यातील या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. 19 सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई: राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat Elections) निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. त्याचसोबत थेट सरपंचपदासाठीही आज मतदान (Voting) होणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 19 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींमध्ये गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवली आहे.
धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील 38, आंबेगाव तालुक्यातील 18, खेड तालुक्यातील 05 आणि भोर तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 45 मतदान होणार आहे.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या,
नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75.
धुळे: शिरपूर- 33.
जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02.
अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01.
वाशीम: कारंजा- 04.
अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08.
नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01.
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04.
नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17.
पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02.
अहमदनगर: अकोले- 45.
लातूर: अहमदपूर- 01.
सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08.
कोल्हापूर: कागल- 01.
एकूण: 608