Gram Panchayat Elections 2023 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, बारामतीत अजितदादांच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल, तर नागपूर, ठाणे, बीडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Gram Panchayat Elections 2023 LIVE: राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी2 हजार 369 ग्रामपंचायतीत मतदान, 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 05 Nov 2023 12:39 PM

पार्श्वभूमी

Gram Panchayat Elections 2023 LIVE Updates: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा (Gram Panchayat Elections) धुरळा उडाला असून सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी, 5 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे....More

Wardha Gram Panchayat Elections 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला समुद्रपूर पोलिसांनी दोन कारवाईत केला दारुसाठा जप्त

Wardha Gram Panchayat Elections 2023 : मतदारांना आमिष दाखविण्याकरीता उमेदवार मोठ्या प्रमाणत दारूचा उपयोग करतात. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे उमेदवाराच्या आशा धुळीस मिळाल्याचे चित्र दिसत आहे. समुद्रपुर पोलिसांनी कारसह तब्बल दहा लाख रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. तर, दुसऱ्या कारवाईत सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराकडून दारूसाठा जप्त करीत त्याला अटक केली आहे.


पोलीस पेट्रोलिंग  दरम्यान जाम चौकमध्ये कारमध्ये दारुसाठा येत असल्याची माहिती मिळताच सदर कार चौकात तपासली. यात कारमध्ये 38 पेट्या देशी दारू आणि 3 पेटी विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी कार आणि दारूसाठ्यासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपी कार चालक अजय हजारे यास ताब्यात घेतले. तर या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे प्रशांत उर्फ बंडू आंबटकर, वैभव बारसकर आणि चंद्रपूर येथील मॉडर्न वाईन शॉप धारक यांना आरोपी करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या कारवाईमध्ये समुद्रपूर तालुक्यातील निभा येथे वाघेडा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार असलेला विकी दिवाकर मसराम आणि त्याचा साथीदार शुभम हेमराज ठवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दुचाकीसह 88 हजारांचा दारूसाठा जप्त केला आहे.