मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 17 तारखेची शिवाजी पार्कवर सभा आहे म्हणत होतो पण ती होती म्हणावं लागेल, असं म्हटलं. माझ्याकडे अजूनही त्या सभेची परवानगी आलेली नाही. सरकारकडून ज्या प्रकारची परवानगी यावी लागते ती आलेली नाही. माझ्याकडे दीड दिवस उरलेला आहे. या वेळात सभा घेणं कठीण होऊन बसतं त्यामुळं शिवाजी पार्कवरील सभा करत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी यादिवशी मुंबई आणि ठाणे या भागात सर्व मतदारसंघात दौरा करणार असल्याचं जाहीर केलं.शिवाजी पार्कवर प्रचाराची सांगता सभा आयोजित करण्यासाठी मनसेकडून परवागनी मागण्यात आली होती. मात्र, परवानगी न मिळाल्यानं मनसेची ती सभा होत नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
17 तारखेला आता दीड दिवसांचा वेळ उरला आहे. दीड दिवसात सभेचं नियोजन होत नाही. आणि त्यात सर्व कामाला लागतील तर मग त्यांना प्रचाराला वेळ मिळणार नाही. त्याशिवाय माझी भाषण खूप झाली आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले. सभेला परवानगी न मिळणं यात राजकारणं नसावं, असं वाटतंय.
जे उमेदवार कामाला लागलेले आहेत त्यांचा संपूर्ण दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी पाच वाजता प्रचार संपतोय,मला फिरायला मिळतं, माझी अनेक भाषणं झालेली आहेत. जे सांगायचं होतं ते घराघरात पोहोचलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
मनसेच्या जाहीरनाम्यात काय?
मनसेचा जाहीरनाम्यात चार विभाग आहेत. पहिल्या भागात मूलभूत गरजांचा मुद्दा घेण्यात आला आहे. दुसऱ्या भागात दळणवळण, वीज, पाणी नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण जैवविविधता याचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या भागात प्रगतीच्या संधी आणि राज्याचे कृषी धोरण याचा समावेश करण्यात आला आहे. चौथ्या भागात मराठी अस्मिता हा विषय घेण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचं एकूण आर्थिक गणित पाहिल्याशिवाय या घोषणा करु शकत नाही. आताच्या सरकारनं या गोष्टी दिलेल्या आहेत. राज्यावर बोजा न येता या गोष्टी सुरु राहिल्या तर मी त्याला गिफ्ट म्हणेल. पण या गोष्टी सुरु ठेवता आल्या नाही तर मी त्याला लाच म्हणेन. राज्याचं आर्थिक स्ट्रक्चर बिघडता कामा नये, असं राज ठाकरे म्हणाले. महिलांना चार पैसे मिळतात हे चांगली गोष्ट आहे पण यातून पुढे वेगळे खड्डे खोदत नाही ना? असं राज ठाकरे म्हणाले.
शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा विद्यामंदिरं उभी करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याची गरज आहे. विद्यामंदिरं चांगली होण्याची गरज आहे, शिक्षण चांगलं मिळणं गरजेचं आहे. गडकिल्ले चांगलं होणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
इतर बातम्या :
MNS manifesto: आम्ही हे करु! राज ठाकरेंच्या मनसेच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?