एक्स्प्लोर

Goa Election Result 2022 : गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

आज गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Goa Election Result 2022 : देशातील छोट्या राज्यांपैकी एक असलेलं राज्य म्हणजे गोवा. मात्र, या ठिकाणी सातत्याने बऱ्याच राजकीय घडामोडी होत असतात. आज गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गोव्यात एकूण 40 विधानसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सध्या गोव्यात भाजपची सत्ता आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली होती. त्यामुळे गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्या काँटे की टक्कर असणार आहे.

दरम्यान, गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार सामना रंगल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. दोघांमध्ये मोठी स्पर्धा असून, भाजप सत्ता कायम रखणार की, काँग्रेस सत्तेत येणार हे सांगता येत नाही. मात्र कॉंग्रेस आणि भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने आता  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर  गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा?  या विषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. गोव्यत मुख्य लढत जरी काँग्रेस-भाजपमध्ये होत असली तरी उत्पल पर्रीकरांसह अनेक अपक्षांनी देखील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. सोबतच शिवसेना देखील या निवडणुकीत जोमाने उतरलेली पाहायला मिळाली.

गोव्यात या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला?

प्रमोद सावंत (भाजप) - साखळी 

डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधीही मंत्री झाले नाहीत. परंतू 2019 साली गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत विराजमान झाले. 

दिगंबर कामत (काँग्रेस) - मडगाव
मनोहर आजगावकर (भाजप) - मडगाव
अमित पालेकर (आप) - सांताक्रूझ
मायकल लोबो (काँग्रेस) - कळंगुट
उत्पल पर्रिकर (अपक्ष) - पणजी
उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. पणजीतून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत.
बाबूश मोन्सेरात (भाजप) - पणजी

गोव्यात या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोव्याच्या निवडणुकीत शिवसेना देखील जोमाने उतरली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी याठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसही गोव्यात निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर तृणमूल कँग्रेस आणि आम आदमी पार्टी देखील गोव्यात यावेळी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे गोव्याची सत्ता कोणाच्या हातात राहणार हे काही तासातच समजणार आहे.
 
महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Embed widget