एक्स्प्लोर

Who is Balasaheb Thackeray true successor : बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? उद्धव, राज की एकनाथ शिंदे? जाणून घ्या काय सांगतो सर्व्हेचा अंदाज

Who is Balasaheb Thackeray true successor : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे, यापैकी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण?या प्रश्नावर घेतलेल्या सर्व्हेमधून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत.

Who is Balasaheb Thackeray true successor : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. भगवी शाल, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि आक्रमक, धारदार भाषणशैली ही त्यांची ओळख बनली होती. हिंदुत्ववादी विचारसरणीचा बुलंद आवाज म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली आणि देशभरात ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून ओळख निर्माण केली. 2012 साली बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यांच्या निधनाला आता 14 वर्षे उलटली आहे. 

मात्र, त्यांच्या राजकीय वारशाचा खरा वारसदार कोण, हा प्रश्न आजही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे नेतृत्व गेले, पण 2022 साली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंड केल्यानंतर याबाबत चर्चा अधिकच रंगल्या. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आले आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? याबाबत चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर C-Voter ने ‘उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे, यापैकी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण?’ या प्रश्नावर घेतलेल्या सर्व्हेमधून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत.

Who is Balasaheb Thackeray true successor : एकूण मतदारांमध्ये उद्धव ठाकरे आघाडीवर

या सर्व्हेच्या एकूण आकडेवारीनुसार, 41 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांनाच ‘ठाकरे ब्रँड’चा खरा वारसदार मानले आहे. तर 27.6 टक्के लोकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि 10.4 टक्के लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पसंती दिली आहे. याशिवाय, 8.8 टक्के मतदारांनी ‘कोणीच नाही’, तर 5.8 टक्के लोकांनी ‘ठाकरे ब्रँड संपला आहे’ असे मत नोंदवले आहे.

Who is Balasaheb Thackeray true successor : तरुणांमध्ये शिंदेंना आघाडी

वयोगटानुसार पाहिले असता, 18 ते 24 वयोगटात एकनाथ शिंदे यांना 35.4 टक्के समर्थन मिळाले असून, याच गटात उद्धव ठाकरे यांना 28.8 टक्के पसंती आहे. मात्र, 25 ते 34, 35 ते 44, 45 ते 54 आणि 55 वर्षांवरील सर्व वयोगटांत उद्धव ठाकरे स्पष्ट आघाडीवर असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, 55 वर्षांवरील वयोगटात तब्बल 50.3 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांनाच ठाकरे ब्रँडचा खरा वारसदार मानले आहे.

Who is Balasaheb Thackeray true successor : सामाजिक गटांनुसारमतांचे चित्र

सर्व्हेमधून सामाजिक गटांनुसारही महत्त्वाचे ट्रेंड समोर आले आहेत. अनुसूचित जाती-दलित गटात 47.7 टक्के, उच्चवर्णीय हिंदूंमध्ये 43.4 टक्के, तर मुस्लिम मतदारांमध्ये 37.1 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी गटात मात्र लढत तुल्यबळ असल्याचे दिसून येते. या गटात उद्धव ठाकरे यांना 36.2 टक्के, तर एकनाथ शिंदे यांना 33.7 टक्के समर्थन मिळाले आहे.

Who is Balasaheb Thackeray true successor : एनडीए समर्थक मतदारांमध्ये शिंदेंना पसंती

राजकीय कल पाहता, एनडीए समर्थक मतदारांमध्ये 39.2 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे ब्रँडचा वारसदार मानले आहे. तर महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये तब्बल 57.7 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे ठाकरे ब्रँडचा मुद्दा थेट राजकीय ध्रुवीकरणाशी जोडला गेल्याचे स्पष्ट होते.

Who is Balasaheb Thackeray true successor : भाषिक आधारावरही फरक

भाषिक गटांमध्येही मतांमध्ये तफावत दिसून येते. मराठी भाषिकांमध्ये 44.3 टक्के लोक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने, तर हिंदी भाषिकांमध्ये 40.2 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दिली आहे. एकंदरीत, ठाकरे नावाशी जोडलेली भावनिक नाळ आणि राजकीय वारसा आजही मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेला आहे. मात्र, तरुण मतदार, ओबीसी समाज आणि एनडीए समर्थकांमध्ये एकनाथ शिंदे यांची पकड मजबूत होत असल्याचेही या सर्व्हेने अधोरेखित केले आहे. त्यामुळेच, ‘ठाकरे ब्रँड’चा खरा वारसदार कोण? हा प्रश्न आगामी काळातही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार, हे मात्र निश्चित आहे.

आणखी वाचा 

BMC Election 2026: मुंबईत ठाकरे अजूनही सर्वात ‘मोठा ब्रँड’? मराठी मतं ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकणार? जाणून घ्या सर्व्हेचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Embed widget