एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान... आता मुलंच नाही तर नातवंडंही पळवू, गिरीश महाजनांचा गर्भित इशारा
आता मुलंच नाही तर नातवंडंही पळवू, असा इशाराच गिरीश महाजनांनी दिला आहे. भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीचा रोमांच शिगेला जात असताना नेत्यांची पळवापळवी सुरु आहे. यावरुन भाजपवर 'मुलं पळविणारी टोळी' असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावर आता मुलंच नाही तर नातवंडंही पळवू, असा इशाराच गिरीश महाजनांनी दिला आहे. भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
LIVE : जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची #तोंडीपरीक्षा https://t.co/70U9ciWc6q
— ABP माझा (@abpmajhatv) March 13, 2019LIVE : एकनाथ खडसेंनी खूप कष्ट घेतलेत, मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे : गिरीश महाजन #तोंडीपरीक्षा https://t.co/GiUDLSJHHu @girishdmahajan pic.twitter.com/EWu9ktnHeV
— ABP माझा (@abpmajhatv) March 13, 2019
'मुलं पळविणारी टोळी' असा आरोप केला जात असल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, आता मुलंच नाही तर नातवंही पळवणार आहोत. त्यांची मुलं नातवंडे ते सांभाळू शकत नाहीत का? असा प्रश्न करत विरोधकांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्लाही त्यांनी दिला. काही पक्षात आमचं घर म्हणजेच आमचा पक्ष असे समीकरण आहे. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायचं काम करायचं का? असा टोलाही त्यांनी लगावला.
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, विखे पाटील यांचा मोठा वारसा आहे. ते मोठे संस्थानिक आहेत. त्यांच्याकडील कुणी आमच्याकडे येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र केवळ आमच्याकडेच अशी इनकमिंग आहे हे चूक आहे. त्यांच्याकडे धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नाना पटोले हे आमचेच आहेत, असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
Election Special | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement