एक्स्प्लोर

Lok Sabha Election: आधी सेंगोल अन् मग नव्या संसद भवनात स्थापन केली नटराजाची विशाल मूर्ती... तामिळनाडूवर भाजपचं लक्ष?

G20 Summit: आधी नव्या संसद भवनात सेंगोलची स्थापना अन् त्यानंतर नटराजाच्या विशाल मूर्तीची स्थापना... सेंगोल अन् विशाल नटाराजाच्या मूर्तीद्वारे मोदी सरकारचा तामिळनाडूशी आपला संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न?

Lok Sabha Election 2023: G20 परिषदेसाठी (G20 Summit) सजवलेल्या भारत मंडपममध्ये अष्टधातूपासून बनवलेली 27 फूट उंच आणि 18 टन वजनाची नटराजाची मूर्ती (Nataraja Statue) बसवण्यात आली आहे. ही विशाल मूर्ती जगातील सर्वात मोठी अष्टधातूची मूर्ती असल्याचं म्हटलं जात आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. विशाल नटाराजाच्या मूर्तीद्वारे सरकारनं तामिळनाडूशी आपला संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पाहायला गेलं तर मोदी सरकारनं असं करण्याची पहिली वेळ नाही. यापूर्वीही सरकारनं अशा महत्त्वाच्या गोष्टींमार्फत कशाना कशाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, याआधी सरकारनं नव्या संसद भवनात सेंगोल स्थापन करणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात थिरुक्कुरलचं उदाहरण दिलेलं. यामार्फत मोदी सरकारनं तमिळ संस्कृतीला थेट स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं. यावरुन अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, यामार्फत भाजप तामिळनाडूवर आपलं लक्ष केंद्रीय करण्यासोबतच आपल्या प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. 

पुढचं वर्ष भाजपसोबतच विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारणही तसंच आहे, कारण पुढच्या वर्षात देशात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशातच भाजपला पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, चोल राजवंश हे दक्षिण भारतातील महान राजवंशांपैकी एक आणि त्यांचा प्रचार करून भाजपला तमिळ लोकांच्या आणि त्यांच्या मतदारांच्या हृदयात स्थान मिळवायचं आहे.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये भाजपला कधीही मोठा विजय मिळाला नाही. अशा परिस्थितीत आगामी सार्वत्रिक निवडणुकीत दक्षिणेकडील राज्यात आपली छाप सोडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तसे पाहता, अलिकडच्या काही वर्षांत भाजप देशाच्या बहुतांश भागांत पोहोचला आहे. केंद्रात दोनवेळा सत्ता मिळवलेल्या भाजपला तामिळनाडूत कोणतीही जादू दाखवता आलेली नाही. मात्र, आता भाजपनं तामिळनाडूकडे विशेष लक्ष केंद्रीय केलं आहे. तामिळनाडूमध्ये आपलं वर्चस्व वाढवण्यावर भाजपचा डोळा आहे. यामुळेच तामिळनाडूतील मतदारांच्या हृदयात स्थान निर्माण व्हावं, यासाठी येथील सांस्कृतिक संबंध ठळक करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Lok Sabha Election: आधी सेंगोल अन् मग नव्या संसद भवनात स्थापन केली नटराजाची विशाल मूर्ती... तामिळनाडूवर भाजपचं लक्ष?

पंतप्रधान मोदींकडून कौतुक 

नटराजाची ही मूर्ती वैश्विक ऊर्जा, सर्जनशीलता आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. G20 शिखर परिषदेत हे आकर्षण ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळमध्ये ट्विटरवर नटराजाच्या पुतळ्याच्या स्थापनेचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान म्हणाले की, "भारत मंडपममध्ये स्थापित केलेली नटराजाची भव्य मूर्ती ही आपल्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाची आठवण करून देणारी आहे. जी 20 परिषदेसाठी जग एकत्र येत असताना, ती भारताच्या जुन्या कलात्मकतेची आणि परंपरांची साक्ष देईल."

1500 वर्षे केलं राज्य 

चोल राजवंशाचा उगम कावेरी नदीच्या खोऱ्यात (आताचे तामिळनाडू) झाला. त्यांनी भारतीय द्वीपकल्पातील लोकांवर तब्बल 1500 वर्ष राज्य केलं. चोल साम्राज्य आपल्या शिखरावर श्रीलंका, मालदीव, मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंडच्या काही भागांमध्ये विस्तारलेलं होतं.

सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक

नव्या संसद भवनात बसवण्यात आलेल्या सेंगोलचा चोल साम्राज्याशीही महत्त्वाचा संबंध आहे. सेंगोल, जे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दिलं गेलं होतं, ते 1947 मध्ये भारतीयांना सत्ता हस्तांतरित करण्याचं प्रतीक होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget