एक्स्प्लोर

दापोलीमध्ये एकाच नावाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची ही खेळी यशस्वी झाली होती. डमी सुनील तटकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकीमध्ये तोच फार्म्युला विरोधकांनी अवलंबला होता परंतु त्यांना यश आले नव्हते.

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातून संजय कदम या नावाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने दापोली विधानसभा मतदारसंघ राज्यात चांगलाच चर्चेत आला आहे. रायगड जिल्ह्यातील शेकापचा फार्म्युला यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे योगेश कदम हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांना शह देण्यासाठी विरोधकांनी त्यांच्याच नावाचे तीन संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. मत विभाजन करण्यासाठी विरोधकांकडून  संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम या एकाच नावाचे तीन अपक्ष उमेदवार उभे करून राष्ट्रवादीचे संजय वसंत कदम यांना शह देण्यासाठी विरोधकांनी ही खेळी खेळली आहे. मात्र ही खेळी किती यशस्वी होते येणाऱ्या मतमोजणी नंतरच कळू शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात दुसऱ्यांदा उभे आहेत. त्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी त्यांच्याच नावाचे तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता आपण मतदारसंघातील विकास करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सांगण्यात आले. संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम हे अपक्ष उमेदवार ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने संजय कदम नावाचा त्यांना कितपत फायदा होतो, हेच पहावे लागेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची ही खेळी यशस्वी झाली होती. डमी सुनील तटकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.  2019 च्या निवडणुकीमध्ये तोच फार्म्युला विरोधकांनी अवलंबला होता परंतु त्यांना यश आले नव्हते. दापोली विधानसभा मतदारसंघातून विरोधकांनी संजय कदम नावाचे 3 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत मात्र मतदार असणार नाहीत ग्रामीण भागातला मतदार नाव बघून नाही तर पक्षाचे चिन्ह बघून मतदान करतात त्यामुळे आपल्या विरोधात विरोधकांनी खेळलेली खेळी सक्सेस होणार नाही आपला घड्याळ चिन्ह  लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचला आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र उमेदवार योगेश कदम पंचेचाळीस हजार मतांनी निवडून येईन असा दावा करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Embed widget