Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
बबनराव ढाकणे यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी उभ आयुष्य लोकांसाठी घातलं. त्यांची पुढची पिढी देखील विधिमंडळात आली पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
Sharad Pawar on PM Modi : देश चालवायचा असेल तर चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार का तर यांना संविधान बदलायचे होते, असा घणाघाती प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आज शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती
शरद पवार म्हणाले की, या राज्यात 900 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार केले गेले हे अतिशय दुर्दैवी आहे. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेसाठी दिलं, त्यांच्याच मुलाच्या मागे आपण ताकद उभं केली पाहिजे. बबनराव ढाकणे यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी उभ आयुष्य लोकांसाठी घातलं. त्यांची पुढची पिढी देखील विधिमंडळात आली पाहिजे. आज देशाची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हातात आहेत. त्यांची बोलण्याची भाषा एक आणि करण्याची एक आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी एक घोषणा केली चारशे पारची. देश चालवण्यास चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार कशासाठी तर यांना संविधान बदलायचे होते, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती.
48 पैकी 31 खासदार तुम्ही महाराष्ट्रात निवडून दिले
ते पुढे म्हणाले की, इंडिया नावाची आघाडी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यामध्ये अनेक पक्षाचे लोक एकत्र आले. आम्ही सर्वांनी ठरवले काहीही झाले तरी घटना बदलू देणार नाही आणि तुम्ही लोकांनी तो पर्यंत हाणून पाडला. 48 पैकी 31 खासदार तुम्ही महाराष्ट्रात निवडून दिले. नीतीशकुमार आणि या लोकांनी मोदींना मदत केली. या राज्यात शेतकऱ्याची आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे, एकदा एका शेतकऱ्याने आत्महत्या तेव्हा मी अस्वस्थ झालो. तेव्हाच्या पंतप्रधानांना सांगितले ही समस्या गंभीर आहे. जोपर्यंत शेतकरी कर्ज मुक्त होत नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबवणार नाही, तेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि 70 हजार कोटींचे कर्ज माफ केले.
इतर महत्वाच्या बातम्या