Elections 2022 Voting Live: निवडणुकीचा रणसंग्राम, गोवा, उत्तराखंडसह यूपीत दुसऱ्या टप्प्याचं मतदान, पाहा प्रत्येक अपडेट्स

Elections 2022 :  आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Feb 2022 07:51 AM
Elections 2022 Voting Live: उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 35.21 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 35.21 टक्के मतदान

    • अल्मोडा -  30.37 %

    • उत्तरकाशी-  40.12 %

    • उधमसिंह नगर  - 37.17 %

    • चमोली - 33.82 %

    • चम्पावत -  34.66 %

    • टिहरी-गढवाल -  32.59 %

    • देहरादून -   34.45 %

    • नैनीताल-  37.41 %

    • पिथौरागढ-  29.68 %

    • पौडी-गढवाल - 31.59 %

    • बागेश्वर - 32.55 %

    • रूद्रप्रयाग - 34.82 %

  • हरिद्वार -  38.83 % 

Goa Elections 2022 Voting Live: गोवा विधानसभेसाठी चुरशीने मतदान; दुपारी 1 पर्यंत 44.62 टक्के मतदान

गोवा विधानसभेसाठी चुरशीने मतदान

दुपारी १ वाजता मतदानाचा टक्का वाढला

दुपारी 1 पर्यंत 44.62 टक्के मतदान

साखळी मतदार संघात सर्वाधिक 54 टक्के चुरशीने मतदान

तर कुपे, पिरोळ आणि मांद्रे मतदार संघात मतदारांचा वाढता प्रतिसाद

Elections 2022 Voting Live: उत्तरप्रदेशातील 9 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 39.7 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तरप्रदेशातील 9 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 39.7 टक्के मतदान

    • सहारनपूर –   42.44 %

    • बिजनौर –  38.64 %

    • मुरादाबाद –  42.28 %

    • संभल-  38.01 %

    • रामपूर –  40.10 %

    • अमरोहा –  40.90 %

    • बदायूं –  35.57 %

    • बरेली  -  39.41 %

  • शाहजहांपूर –  35.47 %

Elections 2022 Voting Live: उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 35.21 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 35.21 टक्के मतदान

    • अल्मोडा -  30.37 %

    • उत्तरकाशी-  40.12 %

    • उधमसिंह नगर  - 37.17 %

    • चमोली - 33.82 %

    • चम्पावत -  34.66 %

    • टिहरी-गढवाल -  32.59 %

    • देहरादून -   34.45 %

    • नैनीताल-  37.41 %

    • पिथौरागढ-  29.68 %

    • पौडी-गढवाल - 31.59 %

    • बागेश्वर - 32.55 %

    • रूद्रप्रयाग - 34.82 %

    • हरिद्वार -  38.83 % 

गोव्यात एक वाजेपर्यंत 44.62 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live:   गोव्यात एक वाजेपर्यंत 44.62 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live: यूपी के दूसरे चरण में अबतक 23 फीसदी वोटिंग, उत्तराखंड में कई जगह EVM खराब

Elections 2022 Voting Live: यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत 23 टक्के मतदान, उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी EVM खराब असल्याच्या तक्रारी 

Goa Elections 2022 Voting Live : गोवा विधानसभा निवडणुकीला गालबोट, डिचोली मतदार संघात एका राजकीय उद्योजकाची आलिशान कार जाळली

गोवा विधानसभा निवडणुकीला गालबोट, डिचोली मतदार संघात एका राजकीय उद्योजकाची आलिशान कार जाळली, अज्ञातांनी पेट्रोल ओतून कार पेटवल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मध्यरात्री ३ ते ४ च्या सुमारास घडली घटना

विरोधकांनी राजकीय सूडबुद्धीने कार पेटवली असल्याचा उद्योजकांचा आरोप

Goa Elections 2022 Voting Live: गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मडगावमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला

Goa Elections 2022 Voting Live:   गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मडगाव इथं आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या वेळी बोलताना कामत यांनी काँग्रेसचं सरकार राज्यात पुन्हा येत असल्याचा विश्वास व्यक्त केला. जनता या व्हॅलेंटाईन डे गिफ्ट काँग्रेसलाच देणार, असं कामतांनी म्हटलंय...  

GOA Election 2022 Live : गोव्यात लोकांना बदल हवाय, आज लोक बदलासाठी मतदान करत आहेत : अमित पालेकर, आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार 

GOA Election 2022 Live : गोव्यात लोकांना बदल हवाय, आज लोक बदलासाठी मतदान करत आहेत : अमित पालेकर, आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार 

Goa Elections 2022 Voting Live: 11 वाजेपर्यंत गोवा विधानसभेच्या 44 जागांसाठी 27 टक्के मतदान तर उत्तराखंडमध्ये 18 टक्के मतदान

Goa Elections 2022 Voting Live: 11 वाजेपर्यंत गोवा विधानसभेच्या 44 जागांसाठी 27 टक्के मतदान तर उत्तराखंडमध्ये 18 टक्के मतदान

UP Elections 2022 Voting Live: 11 वाजेपर्यंत उत्तरप्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी 23 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live: 11 वाजेपर्यंत उत्तरप्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी 23 टक्के मतदान  

Elections 2022 Voting Live: बाबा रामदेव यांनी केलं मतदान, त्यांच्यासोबत आचार्य बालकृष्ण यांचंही मतदान

 Elections 2022 Voting Live:  बाबा रामदेव यांनी केलं मतदान, त्यांच्यासोबत आचार्य बालकृष्ण यांचंही मतदान

Goa Elections Voting Live :गोव्यातील सगळ्याच मतदान केंद्रांवर लोकांची मोठी गर्दी

मोठ्या उत्साहने गोवेकर मतदान केंद्रांवर पोहोचत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत 11% मतदान झालं आहे. तर गोव्यातील सगळ्याच मतदान केंद्रांवर लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. 

Elections 2022 : गजवा-ए-हिंदचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

 Elections 2022 : 'या नव्या भारतामध्ये सर्वांचा विकास होईल कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही असं योगी म्हणाले आहेत. नवीन भारत संविधानानुसार काम करेल शरीयतप्रमाणे नाही असंही योगी म्हणाले आहेत. हिजाबवरुन देशामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगींनी केलेल्या या वक्तव्यामधून त्यांनी सांकेतिक पद्धतीने विरोधकांना इशारा दिलाय. गजवा-ए-हिंदचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही'- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Goa Elections Voting Live : सकाळी 9 वाजेपर्यंत 11.04 टक्के मतदान

Goa Elections Voting Live : गोवा मतदान टक्केवारी

राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.04 टक्के मतदान

साखळी मतदार संघात सर्वाधिक 14.32 टक्के मतदान

तर सर्वात कमी शिरोडा मतदार संघात 05.06 टक्के मतदान 

सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणा

Goa Elections Voting Live : सकाळी 9 वाजेपर्यंत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 11.4 टक्के मतदान, उत्तरप्रदेशात 9.45 टक्के तर उत्तराखंडमध्ये 5.15 टक्के मतदान  

Goa Elections Voting Live : सकाळी 9 वाजेपर्यंत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 11.4 टक्के मतदान, उत्तरप्रदेशात 9.45 टक्के तर उत्तराखंडमध्ये 5.15 टक्के मतदान  

UP Election Voting: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी रामपूरमध्ये केलं मतदान

UP Election Voting: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी रामपूरमध्ये केलं मतदान 

Elections 2022 Voting Live: यूपी,उत्तराखंड,गोव्यामध्ये मतदान सुरु, यूपीचे मुख्यमंत्री म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता नाही तरपश्चिम बंगाल आणि केरळसारखं होईल

Elections 2022 Voting Live: यूपी,उत्तराखंड,गोव्यामध्ये मतदान सुरु, यूपीचे मुख्यमंत्री म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता नाही तरपश्चिम बंगाल आणि केरळसारखं होईल

Goa Elections 2022 Live:  हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa Elections 2022 Live:  हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज सकाळी 7 वाजता बायणा-वास्को येथील माता उच्च माध्यमिक विद्यालयामधील बूथ क्रमांक 7 वर बजावला मतदानाचा हक्क

Uttarakhand Elections 2022 Voting Live: यूपी-गोव्यानंतर उत्तराखंडमध्येही मतदानाला सुरुवात

Uttarakhand Elections 2022 Voting Live:  यूपी-गोव्यानंतर उत्तराखंडमध्येही मतदानाला सुरुवात; उत्तराखंडमध्ये आज सर्व 70 जागांसाठी मतदान होत आहे.  

Elections 2022 Voting Live: उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान पार पडतेय

UP Elections 2022 Voting Live:  उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान पार पडत आहे.

Goa Elections 2022 Live: पणजीमध्ये उत्पल पर्रीकर विरुद्ध बाबूश मोंसेरात लढत, उत्पल पर्रीकर मतदानासाठी केंद्रावर पोहोचले

Goa Elections 2022 Live: पणजीमध्ये उत्पल पर्रीकर विरुद्ध बाबूश मोंसेरात लढत, उत्पल पर्रीकर मतदानासाठी केंद्रावर पोहोचले

PM Modi on Elections 2022 Voting Live: मतदानाआधी पंतप्रधान मोदींचं आवाहन, म्हणाले, आधी मतदान, मगच दुसरं काम 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन राज्यांमधील मतदान सुरु होण्याआधी ट्वीट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, 'उत्तर प्रदेश विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासह उत्तराखंड आणि गोव्यात सर्व जागांसाठी मतदान आज पार पडत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, या पावन पर्वात सहभागी व्हा. मतदानाचा नवा विक्रम बनवा. लक्षात ठेवा- आधी मतदान, मगच दुसरं काम...

Elections 2022 Voting Live: उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, उत्तराखंडमध्ये सर्व 70 तर गोव्यात सर्व 40 जागांसाठी मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, उत्तराखंडमध्ये सर्व 70 तर गोव्यात सर्व 40 जागांसाठी मतदान, सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान 
- पाहा प्रत्येक अपडेट्स 

#Election2022 #GoaElections2022 #UPElections2022 #UttarakhandElections2022 

https://marathi.abplive.com/elections/elections-2022-voting-live-uttar-pradesh-goa-uttarakhand-assembly-elections-live-updates-14-february-up-cm-yogi-akhilesh-yadav-bjp-congress-voting-percentage-candidates-first-time-voter-violence-news-1033044 

Goa Election Live Updates : गोव्याच्या राज्यपालांनी केलं मतदान 

गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सपत्नीक मतदान केलं 

Goa Election 2022 Live : गोव्यात 40 जागांसाठी मतदान

Goa Election 2022 Live :   गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. गोवा विधानसभेत सध्या चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी गोव्यात बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. तिथे आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC)हे निवडुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच काँग्रेस आणि भाजप यांच्यातही चांगली लढत होणार असल्याचा अंदाज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनीही गोव्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, या सर्व निवडणुकांचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया जरी आज पार पडली तरी कोण निवडणूक जिंकले हे पाहण्यासाठी 10 मार्चची वाट पाहावी लागणार आहे.

Uttarakhand Election Live Updates : उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान

उत्तराखंडमधील सर्व 70 विधानसभा जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून निवडणुका घेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतजानाला सुरूवत होणार आहे. संध्याकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकऱ्यांनी दिली.

UP Election Live : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान होणार आहे.

Elections 2022 : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे. ते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत.

Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम

Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्य दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 55 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

पार्श्वभूमी

Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 55 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे. ते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत.

यूपीच्या कोणत्या जागांवर मतदान 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान होणार आहे.

उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान

उत्तराखंडमधील सर्व 70 विधानसभा जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून निवडणुका घेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतजानाला सुरूवत होणार आहे. संध्याकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकऱ्यांनी दिली.

गोव्यात 40 जागांसाठी मतदान

गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. गोवा विधानसभेत सध्या चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी गोव्यात बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. तिथे आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC)हे निवडुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच काँग्रेस आणि भाजप यांच्यातही चांगली लढत होणार असल्याचा अंदाज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनीही गोव्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, या सर्व निवडणुकांचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया जरी आज पार पडली तरी कोण निवडणूक जिंकले हे पाहण्यासाठी 10 मार्चची वाट पाहावी लागणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.