एक्स्प्लोर

Election 2022 : पंजाबमध्ये काँग्रेसचं दलित कार्ड, यूपीत अखिलेश यांचं मंडल 2.0 फेल, जातीय समीकरणांपलीकडे होतंय मतदान?

Election Result 2022 : उत्तर प्रदेश, पंजाबमधल्या आजच्या निकालानं जातीपातींची समीकरणं जोडत राजकारण करणा-या नीतीलाही चपराक लगावल्याचं दिसतं आहे.

Election Result 2022 : पाच राज्याच्या आजच्या निकालानं जातींच्या पारंपरिक राजकारणाचे प्रयोगही निष्प्रभ करुन टाकले आहेत. पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री देण्याचा काँग्रेसचा प्रयोग...उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचं मंडल 2.0 हे दोन्ही प्रयोग आजच्या निकालानं अपयशी ठरवले. पंजाबमध्ये प्रस्थापितांना नाकारत लोकांनी आपचा पर्याय निवडला. तर जातीपातींची समीकरणं साधत गठबंधनाची मोळी बांधूनही अखिलेश यांना विजयश्री खेचता आली नाही

 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मायावतींना सोबत घेऊन फसलेले अखिलेश यावेळी मित्र निवडताना सावध होते. त्यांनी छोट्यामोठ्या जातींवर प्रभाव असलेले पक्ष निवडले. सुहेलदेव समाज पार्टीचे ओमप्रकाश राजभर यांना सोबत घेतलं, अपना दलचा एक गट त्यांच्यासोबत होता. शिवाय वेस्टर्न यूपीत जाटांवर प्रभाव असलेला जयंत चौधरी यांचा आरएलडीही त्यांच्यासोबत होता.  पण जातीपातींची ही गणितं निकालाच्या गणितात मात्र तितकी यशस्वी ठरली नाहीत. मागच्यावेळी 60 च्या घरात असलेली सपा यावेळी दीडशेच्या घरात पोहचली. पण भाजपला मात्र रोखू शकली नाही.

 पंजाब हा देशात सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. तब्बल 30 टक्के दलित लोकसंख्या या राज्यात राहतात. काँग्रेसनं चरणजीतसिंह चन्नी यांच्या रुपानं पंजाबला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री दिला पण त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. 

कायम म्हटलं जातं की उत्तर प्रदेशच्या राजकारणावर जातीपातींचा पगडा अधिक आहे. समाजवादी पक्षाकडे मुस्लिम- यादव, बसपाकडे जाटव- दलित हे मतदार जणू ठरलेले अशीच वाटणी होते. पण त्यानंतरही भाजपला इतकं मोठं यश मिळत असेल तर ही पारंपरिक मांडणी बदलण्याची गरजही आजच्या निकालांनी अधोरेखित केलंय. निकालानंतरची मतदानाची टक्केवारी या अभ्यासासाठी जास्त महत्त्वाची असणार आहे. 

इतर महत्त्वाचे बातम्या :

उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी हैं, पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपची घोषणा, मुंबई महापालिका जिंकण्याचाही विश्वास

Goa Winner List : गोव्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर, वाचा भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी

केजरीवालांच्या 'झाडू'पुढे विरोधक साफ, एकहाती सत्ता, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही धोबीपछाड 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
BaramatI News: बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले,
बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो चहा-नाष्ट्यासाठी दिलेला खर्च...", बारामतीत नेमकं काय घडलं?
'अंदर से कौन था ते 27 तारखेला कळेल!' प्रतापसिंह पाटलांचा मोठा दावा; महायुतीत नेमकं काय शिजतंय?
'अंदर से कौन था ते 27 तारखेला कळेल!' प्रतापसिंह पाटलांचा मोठा दावा; महायुतीत नेमकं काय शिजतंय?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget