(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले सगळे आघाडीवर; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानूसार गुवाहाटीला गेलेले सर्व आमदार आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.
Eknath Shinde All Candidate Result Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 मुंबई: राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते. पहिल्या कौलनुसार महायुतीला 193 जागांवर आघाडी मिळाली असून 55 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर, इतरांमध्ये 8 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले सगळे आघाडीवर-
राज्यानं गेल्या अडीच वर्षांत अभूतपूर्व सत्तासंघर्ष पाहिला आहे. अशातच ज्या घडामोडींमुळे सत्तासंघर्ष उद्भवला, त्या घडामोडी म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील बंडाळी. अगदी शिवसेनेतील फुटीपासून महाविकास आघाडी कोसळणं आणि थेट शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेले एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यापर्यंत अनेक हादरवणाऱ्या घटना महाराष्ट्रानं याची देही, याची डोळा अनुभवल्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत बंडावेळी गेलेल्या आमदारांचं काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानूसार गुवाहाटीला गेलेले सर्व आमदार आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.
महायुतीमध्ये कोण आघाडीवर?
288 मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार, भाजपला 115, शिवसेना शिंदे गटाला 58, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 42 जागा मिळताना दिसत आहे.
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल, पुढील १० तासांत जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेचे वेगवान, अचूक निकाल तुम्हाला सकाळपासूनच एबीपी माझावर पाहता येणार आहेत... प्रत्येक मतदारसंघात कुणी मारली बाजी? कोण होणार तुमचा आमदार? कुणाची येणार सत्ता? काय घडामोडी घडणार? राष्ट्रपती राजवट लागणार का? कोण होणार किंगमेकर? या सर्व प्रश्नांची उत्तर, सविस्तर विश्लेषण.. तुम्हाला 'माझा'वर पाहता येणार आहे. महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.
संबंधित बातमी:
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार