एक्स्प्लोर

माझ्या विरोधात कुणी विष पसरवलं, वरिष्ठांना नक्की विचारणार : एकनाथ खडसे

इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली. मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. हे सगळं करून झाल्यानंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला तीन वर्षापासून मंत्री पदावरून दूर केलं गेलं, असे खडसे म्हणाले.

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताईनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचं उमेदवार म्हणून नाव नसल्याने नाराज झालेल्या खडसेंनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या समोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यावेळी खडसे म्हणाले की, गेली चाळीस वर्ष आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो. इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली. मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. हे सगळं करून झाल्यानंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला तीन वर्षापासून मंत्री पदावरून दूर केलं गेलं, असे खडसे म्हणाले. भोसरी जमीन प्रकरण आणि दाऊदशी संभाषणाच्या कथित प्रकरणात विनाकारण आपल्यावर आरोप झाले चौकशीत काहीही आलं नाही. या घटनांमध्ये आपल्यावरील आरोप कोणी सिद्ध करून दाखविल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ असं खडसे यांनी म्हटलं आहे. आपल्याला तिकीट मिळो अथवा न मिळो जनता आपल्या पाठीशी आहे, असे यावेळी खडसे म्हणाले. गेली चाळीस वर्ष जनतेने साथ दिल्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो असल्याने सांगत खडसे यांनी जनतेचे आभार मानले. पुढील काळात देखील साथ जनतेने द्यावी असं भावनिक देखील खडसे यांनी यावेळी केलं. यादीत नाव नसल्याने निराश झालेल्या खडसे म्हणाले की, चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला का असं वागवलं गेलं, या बाबत मी माझ्या 'आकां'ना विचारणार आहे. माझा गुन्हा काय ते तरी सांगावं, असंही खडसे म्हणाले. पहिले ज्यावेळी शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्री व्हायचा त्यावेळी युतीचा मुख्यमंत्री अशी ओळख असायची मात्र आता 'आपला' मुख्यमंत्री पाच वर्षासाठी राहिला. या काळात सरकारमधील एकही मंत्री माझ्या नजरेला नजर देऊ शकला नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले. जे वाईट आहे त्यावर प्रहार केला. समोर कोण आहे त्याची कधीच चिंता केली नाही, असेही खडसे यावेळी म्हणाले. वरिष्ठांना मी नक्की विचारणार की माझ्या विरोधात कुणी विष पसरवलं.  वेळ पडल्यास मी तुमच्याशी देखील संवाद साधेल, अशा शब्दात खडसे यांनी सूचक इशारा देखील दिला आहे. मला, आता तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि ते तुम्ही मला द्याल हा विश्वास आहे, असे भावनिक आव्हान देखील खडसे यांनी केले. एकनाथ खडसे यांचं नाव पहिल्या यादीत न आल्याने लेवा पाटीदार समाजात तीव्र संताप दरमयान, भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न आल्याने मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते तसेच लेवा पाटीदार समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये लेवा पाटीदार समाज मोठ्या प्रमाणात विखुरला गेला आहे. संपूर्ण लेवा पाटीदार समाज हा भाजपच्या पाठीशी उभा आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भाजपने जर उमेदवारी दिली नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भोरगाव लेवा पाटीदार समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. आमचा समाज नेहमी भाजपाला साथ देणारा आहे. म्हणून खडसे यांना जे तिकीट अजूनपर्यंत दिलेलं नाही ते न्यायपूर्वक आणि सन्मानपूर्वक द्यावं लागेल. पहिल्या यादीत खडसे यांना तिकीट न दिल्याने संपूर्ण समाजाला प्रचंड मनस्ताप झाला आहे, असेही रमेश विठू पाटील म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेवा पाटीदार समाज हा मोठ्या संख्येत असल्याने लेवा पाटीदार समाज काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Embed widget