एक्स्प्लोर

नियोजनाचा अभाव, पालघरमधील काही मतदान केंद्रांवर रात्री 10.40 पर्यंत मतदान

महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांची मतदानाची अंतिम टक्केवारी काल (29 एप्रिल) रात्री जाहीर झाली. मात्र गोंधळामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची टक्केवारी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (30 एप्रिल) दुपारी बारा वाजता जाहीर करण्यात आली.

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये 63.72 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत असली तरी पालघर लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर रात्री 10:40 वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. मतदार जास्त आणि मतदान प्रक्रियेची साहित्य, यंत्रणा कमी यामुळे भोंगळ कारभार झाल्याचं समोर आलं. परंतु तब्बल 15 ते 16 तास चाललेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे पालघर लोकसभेतील निवडणूक प्रक्रियेचे मात्र धिंडवडे उडाले. तर मतदारांचे मात्र हाल झाले.  या गोंधळामुळे महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांची मतदानाची अंतिम टक्केवारी काल (29 एप्रिल) रात्री जाहीर झाली. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघाची टक्केवारी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (30 एप्रिल) दुपारी बारा वाजता जाहीर करण्यात आली. अपुऱ्या यंत्र सामुग्रीमुळे मतदानाला वेळ लागल्याने मतदारांना चार ते पाच तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं. तर या ठिकाणी पिण्यासाठी पाण्याची सोयही नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या.   ईव्हीएमचा घोळ, चार तासांपासून मतदार रांगेत, उशिरापर्यंत मतदान चालणार उशिरा मतदान झालेली केंद्र 270 किरण पाटील शाळा धानीवबाग पूर्व (नालासोपारा) पेल्हार जिल्हापरिषद शाळा पालघर विधानसभेतील दोन केंद्र विक्रमगड विधानसभेतील दोन केंद्र नालासोपारा पूर्व धानीवबाग आणि पेल्हार गावातील जिल्हा परिषद शाळा येथे रात्री साडे दहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. धानीवबाग येथील किरण पाटील शाळेतील 270 मतदान केंद्रावर रात्री 9 वाजून 16 मिनिटाला तर पेल्हारच्या जिल्हा परिषद शाळेवरील केंद्रात 10 वाजून 35 मिनिटाला शेवटच्या मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 270 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 2494 मतदारांचे मतदान होते, यापैकी 1458 एवढे मतदान झालं. शेवटच्या मतदाराने 9.16 वाजता मतदान केलं. पेल्हार गावातील जिल्हा परिषद  शाळेतील मतदान केंद्रावर एकूण 1652 एवढे मतदार होते. त्यांपैकी 945 जणांनी मतदान केलं आहे. याठिकाणी 10.35 मिनिटाला शेवटच्या मतदाराने मतदान केलं . पालघरमध्ये किती मतदार? पालघर मतदारसंघात एकूण 18 लाख 85 हजार 297 मतदार आहेत. यामध्ये 9 लाख 88 हजार 997 पुरूष, 8 लाख 96 हजार 189 महिला आणि 111 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. त्यापैकी 12 लाख 01 हजार 298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 641156 पुरुष (64.83 टक्के), 560118 महिला (62.50 टक्के) आणि 24 तृतीयपंथीयांचा (21.62 टक्के) समावेश होता. या निवडणुकीच्या रिंगणात 12 उमेदवार होते. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे  डहाणू - 67.13 टक्के विक्रमगड - 69.50 टक्के पालघर - 68.57 टक्के बोईसर - 68.49 टक्के नालासोपारा - 52.16 टक्के वसई- 65.24 टक्के. जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्रे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत पालघर इथल्या स्ट्रॉंग रुममध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आला होता. 23 मे रोजी सकाळी 8 वाजता गोडाऊन क्र. 2, सूर्या कॉलनी इथे मतमोजणी होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget