Dindoshi Vidhan Sabha Constituency: दिंडोशी विधानसभा मतदारसंघात सुनील प्रभू गड राखणार की संजय निरुपम बाजी मारणार?
Dindoshi Vidhan Sabha Constituency: दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये दिंडोशीची (Dindoshi Vidhan Sabha Constituency) जागा चर्चेची ठरली आहे. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून संजय निरुपम (Sanjay Nirupam) तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून सुनील प्रभू (Sunil Prabhu) निवडणूक लढवत आहे. 2014 आणि 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. दरम्यान दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि इतर समुदायांचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. मराठी मतदार पारंपरिकपणे शिवसेनाचे पारंपारिक मतदार होते, परंतु भाजपनेही या क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे.
दिंडोशीचं राजकीय गणित काय?
दिंडोशीची एकूण लोकसंख्या 1,56,300 असून त्यात 55% पुरुष आणि 45% महिला मतदार आहेत.
2019 मध्ये मतदानाची टक्केवारी 55.49% होती तर 2014 मध्ये 53.63% मतदारांनी मतदान केले.