एक्स्प्लोर

धारावी मतदारसंघ : वर्षा गायकवाडांविरोधात भाजपच्या दिव्या ढोले, शिवसेनेच्या बाबूराव मानेंची मोर्चेबांधणी

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या धारावी या मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे. अपवाद साल 1999 चा, जेव्हा इथे शिवसेनेचे उमेदवार बाबुराव माने निवडून आले होते.

दक्षिण मध्य मुंबई विभागाच्या मध्यभागी असलेला धारावी मतदारसंघ. मुळात मुंबई शहर आणि उपनगराला हा जोडणारा भाग मुंबईच्याही मध्यावर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धारावी म्हटलं की नजरेसमोर येते ती आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी. इथला बहुसंख्य मतदार मुस्लिम असला तरी त्याखालोखाल दक्षिण भारतीय, मराठी आणि गुजराती मतदारही इथं आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम साहजिकच इथल्या उमेदवार निवडीवर आणि आमदारनिवडीवर देखील होतो. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे. (अपवाद साल 1999 चा, जेव्हा इथे शिवसेनेचे उमेदवार बाबुराव माने निवडून आले होते.) त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा भक्कम गड मानला जातो. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी खासदारकीकडे आपला मोर्चा वळवल्यापासून त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड या मतदारसंघातून 2004, 2009 आणि 2014 सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते इथं असले तरी अंतर्गत झोपडपट्टी भागात त्यांची म्हणावी तशी पकड नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतही बाबूराव माने 15 हजार मतांच्या फरकाने पडले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आलेली भगव्याची लाट पाहता बाबूराव माने पुन्हा धारावीवर भगवा फडकवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र जर युती निवडणुकीच्या आधीच जाहीर झाली तर भाजपच्या दिव्या ढोले की बाबूराव माने यांनी इथून उमेदवारी मिळणार हे अजुनही गुलदस्त्यात आहे. समजा जर गेल्यावेळेप्रमाणे युती न होता शिवसेना-भाजपनं स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा एकदा मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा काँग्रेसलाच होऊ शकतो. धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकासाचा मुद्दा प्राधान्यानं तडीस लावणार असल्याचं जाहिर केलं होतं. मात्र गेल्या पाच वर्षांत त्याचं काय झालं? असा सवाल इथले मतदार विचारत आहेत. जागतिक पातळीवर निविदा काढूनही त्याला प्रतिसाद का मिळाला नाही, याचं उत्तर अनुत्तरीत आहे. शिवाय इथल्या नागरी समस्या, प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेले लघुउद्योग, इथलं जगप्रसिद्ध लेदर मार्केट, नागरिकांच्या समस्या, त्यांना न मिळणाऱ्या सोयीसुविधा, क्रीडा संकुलाची वानवा हे मुद्दे विचारात घेतले तर सलग तीन टर्म आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या वर्षा गाकवाड यांनी या विभागासाठी काय केलं? असा सवालही इथले नागरिक विचारत आहेत. त्यामुळे यंदा इथले नागरिक कुणाच्या नावाला पसंती देतात? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी वर्षा गायकवाड, काँग्रेस – 47,718 बाबुराव माने, शिवसेना – 32,390 दिव्या ढोले, भाजप – 20,763 नोटा – 1,436 मतदानाची टक्केवारी – 49.42 %

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget