एक्स्प्लोर

Dhanteras 2024: हौसेला मोलं नसतं! भाव गगनाना भिडूनही धनत्रयोदशीला 55 टन सोन्याची विक्री, बाजारपेठेत 850 कोटींची उलाढाल

Dhanteras 2024: धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने बाजारात पंधराशे कोटी रुपयांची उलाढाल झाली.

Dhanteras 2024: दिवाळी सणातील धनत्रयोदशीस (Dhanteras) नागरिक आवर्जून सोने खरेदी करतात, या मुहूर्तावर सोने खरेदी-विक्रीमुळे मोठी उलाढाल झाली आहे. सोन्याचा दर उच्चांक गाठत असताना देखील ग्राहकांनी धनत्रयोदशीला आवर्जून सोने खरेदीचा मुहूर्त साधला. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले असताना आपल्या क्षमतेनुसार सोन्या-चांदीची खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. धनत्रयोदशीच्या (Dhanteras) निमित्ताने काल (मंगळवारी) मुंबईत तब्बल एक हजार किलो सोन्याची खरेदी-विक्री झाली आहे. धनत्रयोदशीच्या (Dhanteras) निमित्ताने बाजारात पंधराशे कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यात सोने- चांदीचा वाटा किमान 850 कोटी रुपयांच्या घरात होता. धनत्रयोदशीला सोने-चांदी किंवा धातू खरेदीला महत्त्व असते. त्यानिमित्ताने मंगळवारी झवेरी बाजारात मोठी गर्दी झाली होती.

अपेक्षेपेक्षा जवळपास 40 टक्के अधिक खरेदी-विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत झवेरी बाजार येथील मुंबई ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांनी माहिती दिली. 'मंदा सोन्याने उच्चांकी दर गाठल्याने वास्तवात खरेदी चांगली, परंतु सामान्य असेल, असा अंदाज होता. मात्र, संपूर्ण देशात 35 ते 40 टन सोने उलाढालीची शक्यता असताना यंदा 55 टन सोन्याची खरेदी झाली. मुंबईतील हा आकडाही मोठा होता. 

प्रारंभी केवळ लहान दागिन्यांची खरेदी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रत्यक्षात सोन्याच्या बिस्किटांपासून कानातले, अंगठ्या व मंगळसूत्राचीही खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली, असे त्यांनी सांगितले. दर अधिक असल्याने मुंबईत 750 ते 800 किलो सोने धनत्रयोदशीच्या (Dhanteras) निमिताने खरेदी होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज होता. प्रत्यक्षात 1 हजार किलो सोन्याची खरेदी-विक्री झाली. अनेक ग्राहकांनी कमी दरांवर खरेदी केलेले जुने सोने मोडून नवीन दागिने तयार केले. काल (मंगळवारी) सोन्याचा दर 82 हजार रुपये प्रतितोळा होता. त्यानुसार 850 कोटी रुपयांची उलाढाल मुंबईत झाली आहे. दुसरीकडे चांदीनेही 1 लाख रुपये किलोचा टप्पा गाठला असताना त्याची उलाढाल काही रोकडा कोटीत होती, असे व्यावसायिकांनी यावेळी सांगितले आहे. 

35 हजार कोटींची उलाढाल 

धनत्रयोदशी (Dhanteras) निमित्ताने देशभरात 35 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) राष्ट्रीय सचिव शंकर ठक्कर यांनी सांगितले आहे. महामुंबईतील हा आकडा दोन हजार कोटी रुपयांच्या घरात होता. त्यात सोने-चांदीसह वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स सामान, कपडे, सजावटीच्या वस्तू, स्वयंपाकाच्या, व इतर वस्तू यांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget