एक्स्प्लोर

बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिल्याने अमरसिंह पंडित समर्थकांमध्ये रोष, गेवराईत होणारी बैठक रद्द

बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थित पाटोदा, आष्टी, शिरूर आणि गेवराई येथे आज बैठक पार पडणार आहे. मात्र अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांचा रोष पाहता पक्षावर गेवराईमध्ये संध्याकाळी सात वाजता होणारी बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे.

बीड : बीडमध्ये राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्याने पंडित समर्थक नाराज आहेत. पंडित समर्थकांमध्ये फेसबुकच्या माध्यमाने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गेवराई येथे आज (शनिवार) संध्याकाळी आयोजित केलेली पक्षाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अमरसिंह पंडित यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या फेसबुक पोस्टने वातावरण अधिकच तापले आहे. 'आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.' अशी पोस्ट विजयसिंह पंडित यांनी सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर शेअर केली होती. त्यामुळे पंडित यांच्यातील नाराजी समोर आली आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची गेवराई येथे होणारी बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली आहे. ज्यामध्ये बीड मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बीडमधून राष्ट्रवादीकडून माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याने त्यांच्या नावाची चर्चा मावळली. तर अमरसिंह पंडित यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र बजरंग सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने अमरसिंह पंडित गटाला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना तिकीट मिळालं, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget