एक्स्प्लोर

माझ्या अध्यक्षतेत तुमच्याही चिक्की-मोबाईलची चौकशी होऊ द्या, धनंजय मुंडेंचं पंकजांना आव्हान

तुम्ही लहान लेकरांच्या चिक्कीत खाता, मोबाईलमध्ये खाता, मग मुंडे साहेबांचा वारसा हाच चालवता का? असा बोचरा सवालही धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना विचारला.

बीड : तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, एकदाच दूध का दूध और पानी का पानी होवू द्या, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. निवडणुकांच्या तोंडावर मुंडे बहीण-भावामध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगलं आहे. एक काम करा ना ताई, कुणी कशात तोडपाणी केली याची साधी सोपी चौकशी करा. जर विरोधी पक्षनेता म्हणून मी तोडपाणी केली असेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हीही राज्याच्या मंत्री आहात, तुमच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. काय चौकशी करायची असेल ती करा. त्यासोबत तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या. एकदाच दूध का दूध और  पानी का पानी होऊ द्या, असं धनंजय मुंडे म्हणाले. आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्कीत खाल्लेले पैसे शेतकऱ्यांना दिलेले बरे, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला 'सात वर्ष झाली, या राजकारणासाठी 100 एकर जमीन विकावी लागली आणि तुम्ही म्हणता आम्ही तोडपाणी केली.' अशा शब्दात धनंजय मुंडेंनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीतर्फे महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी बीडमधील शिरुर कासारमध्ये आयोजित जाहीर सभेत धनंजय मुंडे बोलत होते. सोनावणेंविरोधात बीडमधून पंकजा मुंडेंची भगिनी आणि भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे पुन्हा रिंगणात आहेत. VIDEO | पंतप्रधानांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया | वर्धा वैद्यनाथ साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट करण्यासाठी मी माझ्या आईचे पैसे दिले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. यावर बोलताना आईचे पैसे देण्याऐवजी तुम्ही पाच वर्षात कमावलेले पैसे शेतकऱ्यांना का देत नाही? असा उपरोधिक सवालही धनंजय मुंडेंनी विचारला होता. तुम्ही लहान लेकरांच्या चिक्कीत खाता, मोबाईलमध्ये खाता, मग मुंडे साहेबांचा वारसा हाच चालवता का? असा बोचरा सवालही धनंजय मुंडेंनी पंकजा यांना विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Embed widget