एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, प्रतिज्ञा खरी ठरणार, फडणवीस 31 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार!

Devendra Fadnavis Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. भाजपने (BJP) या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी (Maharashtra CM) देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर सर्व प्रक्रिया पार पडून लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येईल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे सगळं ठरल्यानुसार सुरळीत पार पडलं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री होणार आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 'मी पुन्हा येईन'ची प्रतिज्ञा खरी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तर भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपला जाणार, अशी शक्यता दिसल्याने सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, त्याला माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. मात्र काल झालेल्या दिल्लीतील बैठकीचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला. यात अजित पवार, प्रफुल पटेल, जेपी नड्डा, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचे दिसून आले. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. याबाबत विचारले असता मी कधी गंभीर, हसरा तुम्हीच ठरवता...मी आजही खुश आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दर्शवला आहे. 

देवेंद्र फडणवीस 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री 

याआधी देवेंद्र फडणवीस हे 2014 मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन दाखवला. 2019 साली भाजपाने शिवसेनेशी हातमिळवणी करत महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महायुतीला 161 जागा मिळाल्या. त्यात भाजपाने 105 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन आग्रह सुरु केला. यानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता. त्यानंतर अजित पवार हे शरद पवार यांच्याकडे गेल्याने हे सरकार केवळ 72 तास चालले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सत्ता स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीस यांना 105 आमदारांसह विरोधक म्हणून बसण्याची वेळ आली. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईल' असा नारा दिला. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. 

'मी पुन्हा येईन'ची प्रतिज्ञा खरी ठरणार

21 जून 2022 साली एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन बंड केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. पुढे अजित पवार देखील शिंदे-फडणवीस यांच्या सोबत सरकारमध्ये स्थापन केले. 2024 सालच्या निवडणुका भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने एकत्रित लढल्या. यात भाजपने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. त्यातच कालच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सगळं ठरल्यानुसार सुरळीत पार पडलं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 'मी पुन्हा येईन'ची प्रतिज्ञा खरी ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादी: 

1. यशवंतराव बळवंतराव चव्हण  - 1  मे 1960 ते 20 नोव्हेंबर 1962

2. मारोतराव सांबशिव कन्नमवार -21 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

3. परशुराम कृष्णाजी सावंत (हंगामी) 25 नोव्हेंबर 1963 ते  04 डिसेंबर 1963

4. वसंतराव फुलसिंग नाईक- 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975

5. शंकरवर भाऊराव चव्हाण - 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977

6.  वसंतराव  बंडुजी पाटील - 17 एप्रिल 1977 ते 6 मार्च 1978

7. वसंतराव बंडुजी पाटील - 7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978

8. शरदचंद्र गोविंदराव पवार -18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980  

9. अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले -9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982

10. बाबासाहेब अनंतराव भोसले - 20 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

11. वसंतराव बंडूजी पाटील- 02 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985

12. वसंतराव बंडूजी पाटील- 10 मार्च 1985 ते 1 जून 1985

13. शिवाजीराव भाऊराव पाटील- निलंगेकर  -03 जून 1985 ते 7 मर्च 1986

14. शंकरराव भाऊराव चव्हाण - 14 मार्च 1986 ते 24 जून 1988

15. शरदचंद्र गोविंदराव पवार -25 जून 1988  ते  3 मार्च 1990

16. शरदचंद्र गोविंदराव पवार -04  मार्च 1990 ते 25 जून 1991

17. सुधाकरराव राजूसिंग नाईक - 25 जून 1991 ते 23 फेब्रुवारी 1993

18. शरदचंद्र गोविंदराव पवार -06 मार्च 1993 ते 13 मार्च 1995

19. मनोहर गजानन जोशी -14 मार्च  1995 ते 30 जानेवारी  1999

20. नारायण तातू राणे 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999

21. विलासराव दगडोजी  देशमुख -18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003

22. सुशिलकुमार संभाजीराव शिंदे - 18 जानेवारी 2003 ते 31 ऑक्टोबर 2004

23. विलासराव दगडोजीराव देशमुख  -1 नोव्हेंबर 2004 ते 7 डिसेंबर 2008

24. अशोक शंकरराव चव्हाण -8 डिसेंबर 2008 ते 8 नोव्हेंबर 2009

25.अशोक शंकरराव चव्हाण - 1 नोव्हेंबर 2009 ते 10 नोव्हेंबर 2010

26. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण - 11 नोव्हेंबर 2010 ते 27 सप्टेंबर 2014

27. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019

28. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस - 23 नोव्हेंबर 2019  ते 26 नोव्हेंबर 2019

29.उद्धव बाळासाहेब ठाकरे - 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022

30. एकनाथ संभाजीराव शिंदे- 30  जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024

आणखी वाचा 

Maharashtra New CM: ठरलं! मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; दिल्लीत मोठा निर्णय, अमित शाह एकनाथ शिंदेंना म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
Embed widget