एक्स्प्लोर

Delhi Election Result 2025: दिल्लीत मोठा उलटफेर, भाजपची जोरदार मुसंडी; अरविंद केजरीवाल यांना धक्का, काँग्रेसचं काय?

Delhi Assembly Election Results 2025: सकाळी 9.30 वाजेपर्यंत दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत.

Delhi Assembly Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Election Results 2025) मतमोजणी सध्या सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या आकडेवारीनूसार भाजपने यंदा दिल्लीत मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. 

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. सकाळी 9.30 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनूसार, मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलानुसार, भाजप 44, आम आदमी पक्ष 24 आणि काँग्रेस पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत बहुमतासाठी 36 मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे. त्यामुळे भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसून येत आहे. 

दिल्लीत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

-रिठाला येथून भाजपचे कुलवंत राणा आघाडीवर
-बल्लीमारनमधून आपचे इम्रान हुसेन पुढे.
-ओखला येथून भाजपचे मनीष चौधरी यांनी आघाडी घेतली.
-मोती नगरमधून भाजपचे सतीश खुराणा आघाडीवर.
-ग्रेटर कैलाशमधून आप नेते सौरभ भारद्वाज यांनी आघाडी घेतली.
-शकूर बस्ती येथून आपचे उमेदवार सत्येंद्र जैन आघाडीवर.
-राजौरी गार्डनमधून भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा आघाडीवर आहेत.
-करावल नगर मतदारसंघातून भाजपचे कपिल शर्मा आघाडीवर.
-बिजवासन मतदारसंघातून भाजपचे कैलाश गेहलोत पुढे आहेत.
-लक्ष्मी नगर मतदारसंघातून भाजप पुढे. 
-बदरपूर मतदारसंघातून भाजपचे नारायण दत्त शर्मा पुढे.
-रोहिणी मतदारसंघातून भाजपचे बिजेंद्र गुप्ता पुढे.
-चांदणी चौकातून भाजपचे सतीश जैन यांच्या पुढे.
-दिल्ली कॅन्टकडून भुवन तंवर पुढे.
-ग्रेटर कैलासमधून आपचे सौरभ भारद्वाज आघाडीवर
-मालवीय नगरमधून भाजपचे सतीश उपाध्याय पुढे.
-बुराडीहून संजीव झा पुढे आहेत.
-ग्रेटर कैलाश मतदारसंघातून सौरभ भारद्वाज पिछाडीवर आहेत.

आंध्र प्रदेश, झारखंडची पुनरावृत्ती होणार?

आम आदमी पक्षाला सत्तेतून बाजूला सारण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपने दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण चांगलेच तापवले. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमांतून 2024 मध्ये अरविंद केजरीवाल यांना याच दारू घोटाळ्याप्रकरणी  तुरुंगवास भोगावा लागला. केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही तुरुंगात जावे लागले. 2024 मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास झाला. त्यानंतर हेमंत सोरेन आणि पवन कल्याण यांना त्यांच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाल्याने विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळवता आला. मात्र, अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमध्ये अशी सहानुभूती मिळाल्याचे दिसून येत नाही. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून उभे राहिलेल्या केजरीवाल यांचे नेतृत्व आता त्याच मुद्द्यांवर अडचणीत आले आहेत. 

संबंधित बातमी:

Delhi Election Result 2025 Live: दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात, निकालाचे प्राथमिक कल समोर, भाजप आणि आपमध्ये कोणाची सरशी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget