Eknath Shinde: सत्तास्थापनेचा तिढा! मुहूर्त लांबणीवर, काळजीवाहू मुख्यमंत्री थेट मूळ गावी, कारण काय?
Eknath Shinde: दिल्ली दरबारी भाजपश्रेष्ठी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडून देखील राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही.
Eknath Shinde: महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे नव्या मुख्यमंत्र्यांची आणि नव्या सरकारची मात्र महाराष्ट्राचे काजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महायुतीच्या सर्व बैठका सोडून त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील धरे येथे त्यांच्या गावे काल शुक्रवारी पोहोचले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली दरबारी भाजपश्रेष्ठी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडून देखील राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही.
आज मुंबईत महायुतीची बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली असल्याची माहिती आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळगावी गेले आहेत. आता याबाबत आज रविवारी (ता.1) घडामोडी होऊ शकतात. महायुतीतील मोठा पक्ष असलेला भाजपकडून विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार असून त्यासाठी दिल्लीतून निरीक्षक येणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधीदेखील पुढील आठवड्यातच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापुर्वी गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतची बैठक झाली. मुंबईच्या दिशेने निघालेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय पातळीवर सकारात्मक चर्चा झाली होती, त्यानंतर त्यांनी आपला पाठिंबा नेते ठरवतील त्या नेत्याला असेल असं सांगितलं होतं. पुढील चर्चेच्या फेऱ्या राज्याच्या राजधानीत पार पडतील, असं सांगण्यात आलं होतं. त दिल्लीमध्ये गृहमंत्री शहांच्या निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या बैठकीस शिंदे यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. शहांसोबतच्या चर्चेमध्ये शिंदे यांनी मानाचे पद मागितल्याची चर्चा आहे
पाच डिसेंबरला शपथविधी शक्यता
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा मुंबईत 5 डिसेंबर रोजी होणार असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी आझाद मैदान, वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमची नावे चर्चेत आहेत. त्यांची चाचपणी देखील सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यासमवेत तिन्ही पक्षांच्या किमान 30 ते 32 मंत्र्यांचा शपथविधी होईल. सध्या शिवाजी पार्क परिसरात महापरिनिर्वाण दिनाची जय्यत तयारी सुरू असल्याने तेथे शपथविधी समारंभ होणार नसल्याचे समजते.