एक्स्प्लोर

Deglur Vidhan Sabha constituency : देगलूरमधून जितेश अंतापूरकर विजयी, काँग्रेसच्या निवृत्ती कांबळेंचा पराभव

Deglur Vidhan Sabha constituency : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातून (Deglur Vidhan Sabha constituency) भाजपचे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत.

Deglur Vidhan Sabha constituency Result  : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातून (Deglur Vidhan Sabha constituency) भाजपचे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांचा पराभव केला आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नांदेड जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. आज आपण देगलूर विधानसभा मतदारसंघाची (Deglur Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघातून  विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर ( Jitesh Antapurkar) हे भाजपकडून मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे निवृत्ती कांबळे (Nivruti Kamble) आणि प्रहारचे सुभाष साबणे (Subhash Sabane) निवडणूक लढवत आहेत.

देगलूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत

देगलूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातील विद्यमान आमदार  जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंगच्या आरोपनंतर अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्या विरोधातही काँग्रेसनं निवृत्ती कांबळेंना तर प्रहारने सुभाष साबणेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय स्थिती होती?

2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते. ते 89 हजार 400 मताधिक्य मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 560 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे यांना 13 हजार 300 इतकी मते मिळाली होती.  मात्र, त्यानंतर 2021 मध्ये आमदार अंतापूरकर यांचं निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर हे विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या  सुभाष साबणेंचा त्यांनी पराभव केला होता. 

देगलूर विधानसभा मतदारसंघ हा एससी (अनुसूचित जाती) वर्गासाठी आरक्षित आहे. या सीटवर सुमारे 22 टक्के दलित मतदार आहेत. आदिवासी समाजाचे मतदान सुमारे 9 टक्के आहे. मुस्लिम समाजाचे मत शेअर 12 टक्क्यांच्या आसपास आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांची तुलना केली असता, ग्रामीण मतदार 78 टक्के आहेत, तर शहरी मतदार 22 टक्के आहेत. यामुळे या क्षेत्रात जातीय आणि सामाजिक गटांचे समीकरण महत्त्वपूर्ण ठरते.

महत्वाच्या बातम्या:

Nanded Assembly Election : नांदेड जिल्ह्यातल्या 9 मतदारसंघाचं चित्र स्पष्ट, बंडखोरांमुळं रंगत वाढली, कोण मारणार बाजी?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget