एक्स्प्लोर

Lok Sabha Election : राष्ट्रवादीला किती जागा मिळतील? बारामतीचा उल्लेख करत दीपक मानकरांनी समीकरण मांडलं..

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी दीपक मानकर यांनी लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार हे सांगितलं आहे. बारामती आणि पुण्यातील जागा महायुतीला मिळेल, असं ते म्हणाले.

पुणे : अजित पवाराच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात महायुतीला 35  जागा मिळतील, असा अंदाज मानकर यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चारशे पार जाणार असल्याचं म्हटलं होतं, ते एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसत आहे, असं दीपक मानकर यांनी म्हटलं. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळेल, असं देखील मानकर यांनी म्हटलं. ते एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलत होते. 

दीपक मानकर काय म्हणाले?

नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा चारशे पार जाणार असं म्हटलं होतं, ते संपूर्ण देशात दिसत आहे. एक्झिट पोल 350 च्या पुढं दाखवत आहेत, सर्व चॅनेल दाखवत आहेत, असं दीपक मानकर यांनी म्हटलं.  मोदींचं जे या देशासाठी काम आहे आणि लोकांनी जे मतदान केलं आहे ते समोर आलं आहे, असं मानकर म्हणाले. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात महायुतीला 35 जागा मिळतील, असं मानकर म्हणाले. बारामती आणि पुण्याची जागा आम्ही शंभर टक्के जिंकणार आहे, असा विश्वास असल्याचं दीपक मानकर यांनी म्हटलं.  बारामती आणि पुण्यातील कार्यकर्त्यांनी काम केलं आहे चांगल्या प्रकारे केलं आहे. नरेंद्र मोदींचा प्रभाव देखील राहिला आहे, असं मानकर म्हणाले. 

पाहा व्हिडीओ :

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान जी प्रत्येकाची इच्छा होती ती या ठिकाणी पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचं मानकर म्हणाले. देशाचा भविष्य चांगलं असावं यासाठी मोदींची गरज आहे, असं दीपक मानकर यांनी म्हटलं.  संपूर्ण जगात जेव्हा मोदी जातात तेव्हा भारत देशाबद्दल बोललं जातं त्यावेळी रुबाब वाढल्याचं दिसतं, असं मानकर म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. या चार जागांवर आम्हाला विजय मिळेल, असं दीपक मानकर म्हणाले. निकाल येईपर्यंत चर्चा सुरु राहतील, असं मानकर म्हणाले.  अजित पवारांचा महाराष्ट्रात जो प्रभाव आहे, त्यांनी जे काम केलं आहे आणि नरेंद्र मोदी यांचं काम आहे, त्याच्या बदल्यात लोकांनी जे मतदान केलंय ते समोर येईल आणि आमच्या जागा निवडून येतील. राष्ट्रवादीचं संघटन आहेच पण त्यासोबत महायुतीपण आहे, असंही  दीपक मानकर म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात बारामती, धाराशिव, शिरुर आणि रायगड या चार जागा लढवल्या होत्या. या ठिकाणी बारामतीत सुनेत्रा पवार, शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव, रायगडला सुनील तटकरे आणि धाराशिवला अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवली होती.

संबंधित बातम्या : 

अजित पवारांचे 3 गडी जिंकले, 4 उमेदवार थोडक्या मतांनी पडले, मोठी संधी हुकली

Arunachal Pradesh Results 2024: अजितदादांच्या राष्ट्रवादीने सीमेपार झेंडे रोवले, निवडणुकीत तीन उमेदवार विजयी, दोन उमेदवार अवघ्या 2 अन् 200 मतांनी पडले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget