एक्स्प्लोर

Bhandara ZP Results: भंडारा जिल्हा परिषदेत भाजपला दणका; काँग्रेस 21 जागांसह सर्वात मोठा पक्ष

भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 21 जागांवर विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 13 आणि भाजपला 12 जागांवर विजय विळवता आला आहे.

Bhandara ZP Results : भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दणका देत सर्वाधिक जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 जागांपैकी काँग्रेसला 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 13 जागा, भाजपला 12 जागा, शिवसेनेला 1, बसपा 1, वंचित 1 तर तीन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेत पुन्हा काँग्रेसच सत्ता स्थापन करणार आहे. 

भंडारा जिल्ह्यात दोन नगर पंचायतींमध्ये भाजपने बाजी मारली आहे. यामध्ये मोहाडी नगर पंचायत आणि लाखांदूर नगर पंचायतचा समावेश आहे. मात्र लाखनी नगर पंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत आपला गड कायम राखला आहे. 

या निवडणुकीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि परीनय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असले तरी घरच्या मैदानावर नाना पटोले यांना मोठा धक्का बसला आहे. कारण भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षांचा पराभाव झाला आहे. विद्यमान अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा पराभव झाला  असला तरी हा नाना पटोले यांनाच धक्का असल्याचं मानलं जात आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या  जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार काल मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले.

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Embed widget