एक्स्प्लोर

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचं टेन्शन आणखी वाढलं; बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नाॅट रिचेबल!

Kolhapur Uttar Vidhan Sabha : राजेश लाटकर अजूनही कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवणार ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. आज उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये (Kolhapur Uttar Vidhan Sabha) अजूनही काँग्रेसचे टेन्शन काही कमी झालेलं नाही. आज (4 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे काही तास बाकी असतानाच कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी दाखल केलेल्या राजेश लाटकर यांनी काँग्रेसचे टेन्शन वाढवलं आहे. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये उमेदवारी रद्द करून काँग्रेसकडून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, राजेश लाटकर यांनी निर्धार कायम ठेवत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, राजेश लाटकर अजूनही कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवणार ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. आज उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लाटकर अज्ञातस्थळी पोहोचल्याने भूया उंचावल्या गेल्या आहेत. 

षड्यंत्र रचून उमेदवारी रद्द करण्यात आली

रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, यावेळी बोलताना राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आली, असा थेट आरोप कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर केला होता. लाटकर यांची समजूत काढण्यासाठी छत्रपती कुटुंबीयांकडून मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, खासदार शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आदी नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांची उमेदवारी मागे घेतली जाईल, अशी चर्चा त्यानंतर रंगली होती. मात्र नाॅटरीचेबल झाल्याने एक प्रकारे काँग्रेसचं टेन्शन वाढलं आहे.

मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? 

दरम्यान, 3 ऑक्टोबर रोजी शाहू महाराज यांनी सांगितले की, एका घराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर पुष्कळ झालं, त्या दृष्टीने आमची हालचाली आणि वाटचाल सुरू होती. जनतेचं हित लक्षात घेऊनच आमची वाटचाल सुरू होती. पण जनतेचा रेटा  होता. त्यामुळे आम्हाला मधुरीमाराजे छत्रपती यांना निवडणुकीला उतरावे लागले. दरम्यान, आमदार जयश्री जाधव यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जयश्री जाधव ह्या या ठिकाणी आल्या होत्या, पक्षाच्या वरिष्ठांची देखील त्यांचे बोलणे झाले असेल. त्या विद्यमान आमदार होत्या त्यामुळे त्यांचे तिकीट नाकारला असेल तर त्या नाराज असणार त्यात शंका नाही.  

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget