एक्स्प्लोर

Himachal Election : हिमाचलमध्ये काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजी भोवणार? तिकीट वाटपावरुन युवक काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर

Himachal Election 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 68 पैकी 67 विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत.

Himachal Election 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा (Himachal Election News) निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अशातच सर्वच पक्षांनी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 68 पैकी 67 विधानसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  पण याच तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असल्याचं दिसत आहे. 

हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी (Himachal Election) रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसनं आपल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या मुला-मुलींना तिकिटं देण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला तिकीट न दिल्यानं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंह सुखू हे प्रामुख्यानं युवक काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यदुपती ठाकूर यांचा एक ऑडिओ व्हायरल होत असून, त्यात त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर येत आहे.

तीन मोठ्या चेहऱ्यांना तिकीट मिळालं नाही

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष निगम भंडारी, प्रदेश कार्याध्यक्ष यदुपती ठाकूर आणि प्रदेश सरचिटणीस सुरजित भरमौरी यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये राजकारण्यांच्या पुढच्या पिढीला तिकीट वाटपात प्राधान्य देण्यात आलं आहे. दिवंगत वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांच्या पुत्रांना तिकीट मिळालं आहे. त्याचबरोबर 'एक कुटुंब एक तिकीट' या नियमाला बगल देत बाप-लेकी दोघांनाही निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता, जो काही तासांपूर्वीच पक्षात दाखल झाला होता.  

सकाळी पक्षप्रवेश, संध्याकाळी निवडणुकीचं तिकीट 

शिमला ग्रामीणचे प्रदेळ अध्यक्ष प्रतिभा सिंह आणि माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. सध्या ते आमदार आहेत. 
वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले राजकृष्ण गौर यांचे पुत्र भुवनेश्वर गौर यांना मनालीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
सिमलाचे खासदार केडी सुलतानपुरी यांचे पुत्र विनोद सुलतानपुरी यांना कसौलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले सत महाजन यांचे पुत्र अजय महाजन यांना काँग्रेसनं नूरपूरमधून संधी दिली आहे.
वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले जीएस बाली यांचे पुत्र आरएस बाली यांना नगरोटामधून तिकीट देण्यात आलं आहे.
वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले कौल सिंह ठाकूर यांना तिकीट देण्याबरोबरच त्यांच्या कन्या चंपा ठाकूर यांनाही काँग्रेसनं मंडीतून उमेदवारी दिली आहे.
चैतन्य शर्मा यांनी सकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि संध्याकाळी गाग्रेट येथून त्यांना तिकीट मिळालं. त्यांचे वडील निवृत्त आयएएस आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राउंड सर्व्हेमध्ये विजयाच्या दाट शक्यता असल्याचं समोर आलं आहे. याच माहितीच्या आधारावर काँग्रेसनं तिकीट वाटप केलं आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee In High Court: हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पीक अपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पीक अपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Sunetra Pawar and Praful Patel NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Embed widget