देशात अन् महाराष्ट्रात देखील पुष्पा, महाराष्ट्राचे पुष्पा 2 हे कोण हे सांगायचे गरज; विजय वडेट्टीवारांचा मिश्किल टोला
Vijay Wadettiwar : उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर भाष्य करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर सडकून टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप आणि गौतम अदानी यांच्या कनेक्शनवरुन टीकेची झोड उठवली होती. विशेषत: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कथित साटेलोटे असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. याशिवाय, अनेक मुद्यांवरुन भाजप आणि गौतम अदानी यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान मंगळवारी झालेल्या भेटीवरुन अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते पद द्यायला तयार असतील तर मग आम्ही....
महाविकास आघाडीकडून अद्याप विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती पुढे आली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केली जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचं बोलणं झालेलं आहे. या अधिवेशनात आमची एकत्र बैठक घेऊ आणि चर्चा करू, विरोधी पक्षनेतेपदाबाबत भाजप तयार आहे का? त्यांची तयारी आहे का ? हे पाहिले त्यांना विचारू आणि मग पक्षनेतेपदासाठी आम्ही नाव देऊ असेही ते म्हणाले. आम्ही पहिलेच नाव देणार नाही, त्यापेक्षा त्यांना विचारून मुख्यमंत्री विरोधीपक्ष नेते द्यायला तयार असतील तर मग आम्ही नाव देऊ असेही ते म्हणाले.
शिंदे अन् अजित पवारांना वारंवार दिल्लीला का जावे लागते?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दोघांनाही दिल्लीच्या हाय कमांडवरच विसंबून राहावे लागेल, त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता हलणार नाही, वारंवार दयेचा अर्ज करून त्यांना तो मिळवावे लागेल,अशी बोचरी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. ईव्हीएमचा घोळ आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी भारतात एकमेव आपला देश आहे ज्यात ईव्हीएम वर निवडणूक होतात. सगळे देश ईव्हीएम वर निवडणूक घेत नाहीत. जगाने ज्या गोष्टी नाकारल्या त्या आपण का करतोय, पुढच्या निवडणूक बॅलेटवर निवाडणूक झाल्या पाहिजे, बॅलेटपेपर हा अंतिम निर्णय आहे. त्यासाठी कोर्टात आम्ही दाद मागण्याची तयारी करतोय असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे ही वाचा