एक्स्प्लोर

तोंडी परीक्षा | सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ, तो जिंकणारच, राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास

सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ आहे. मला धनुष्य उचलावे लागणार नाही. सध्या माझी भूमिका सध्या वडिलांची आहे आणि वडील म्हणून माझा विश्वास आहे कि तो नक्की निवडून येईल

मुंबई : अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे नक्की जिंकणार आहेत. सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ आहे. मला धनुष्य उचलावे लागणार नाही. सध्या माझी भूमिका सध्या वडिलांची आहे आणि वडील म्हणून माझा विश्वास आहे की, तो नक्की निवडून येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात बोलत होते.
आपण पक्षाने दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली आहे. सुजयच्या बाबतीत निर्णय करण्याचा प्रश्न आला त्यावेळी पक्षांतर्गत काही गोष्टी घडल्या, ज्यावर मी बोलू इच्छित नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सुजयसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता. सुजयने काम केलं आहे. त्याचा लोकसंग्रह आहे. सुजय माझा मुलगा आहे, म्हणून मी उमेदवारी मागत नव्हतो. त्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, म्हणून त्याला आघाडीकडून उमेदवारी मिळणे आवश्यक होते, असे विखे पाटील यावेळी म्हणाले.
अहमदनगरची जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 3 वेळा पराभव झाला आहे. त्यामुळं ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी होती, परंतु असं घडलं नाही, असेही ते म्हणाले.  औरंगाबाद जागेची अदलाबदल झाली असती, असेही म्हणाले. सुजय करता मी मागणी करणं चुकीचं ठरलं असतं. रावेरची जागा सोडली, औरंगाबादमध्ये अजूनही गोंधळाची स्थिती आहे.
अहमदनगरमध्ये समोरच्या पक्षाकडे सक्षम उमेदवारही नव्हता. राष्ट्रवादीने 9 ते 10 उमेदवार तपासून नकार दिला होता. अशा स्थितीत आपली एक जागा वाढावी असा विचार पक्षनेतृत्वाकडून होणे गरजेचे आहे, मात्र तसे झाले नाही, असेही ते म्हणाले.
आज सुजयचे आजोबा नाहीत नातवाचे लाड करायला
आज सुजयचे आजोबा नाहीत नातवाचे लाड करायला. सुजयलाही नातू म्हणून आश्वासन द्यायला हवं होतं, असा टोलाही त्यांनी यावेळी शरद पवार यांना लगावला. सुजयने राष्ट्रवादीत जावं यासाठी चर्चा झाली, मात्र पवारसाहेबांची तयारी नव्हती. ज्या पक्षाच्या नेत्याच्या मनात आपल्याबद्दल एवढा रोष आहे, तिथे जाऊन आत्महत्या करावी लागली असती, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.  त्यामुळे सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय योग्यच होता. त्याला भाजपने सन्मानाने बोलावले. मुलगा पुढं जातोय याचं समाधान आहे, असेही ते म्हणाले.
15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा काँग्रेसवर नाराज असलेले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. येत्या 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं राधाकृष्ण विखेंनी यावेळी जाहीर केलं आहे.  माझी भूमिका स्पष्ट आहे. मी गोंधललेलो नाही, उलट माझ्यामुळे अनेकजण गोंधळले आहेत. सुजयच्या तिकिटावरून निर्माण झालेला गोंधळ थांबविण्याचा मी प्रयत्न केला मात्र गोंधळ थांबवू शकलो नाही, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.मी एकच तत्व डोळ्यासमोर ठेवलं. वेळ हा सर्व गोष्टींवर उपाय आहे. माझी भूमिका नेहमी स्पष्ट राहिली आहे, असेही ते म्हणाले.  हा माझ्या दृष्टीने फार कठीण प्रश्न नव्हता, असेही ते म्हणाले. आपण पक्षाने दलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली आहे. सुजयच्या बाबतीत निर्णय करण्याचा प्रश्न आला त्यावेळी पक्षांतर्गत काही गोष्टी घडल्या, ज्यावर मी बोलू इच्छित नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget