एक्स्प्लोर

तोंडी परीक्षा | 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा

सुजयच्या तिकिटावरून निर्माण झालेला गोंधळ थांबविण्याचा मी प्रयत्न केला, मात्र गोंधळ थांबवू शकलो नाही, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

मुंबई :  काँग्रेसवर नाराज असलेले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात बोलत होते.
येत्या 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं राधाकृष्ण विखेंनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत जाहीर केलं आहे.  माझी भूमिका स्पष्ट आहे. मी गोंधललेलो नाही, उलट माझ्यामुळे अनेकजण गोंधळले आहेत. सुजयच्या तिकिटावरून निर्माण झालेला गोंधळ थांबविण्याचा मी प्रयत्न केला मात्र गोंधळ थांबवू शकलो नाही, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.
मी एकच तत्व डोळ्यासमोर ठेवलं. वेळ हा सर्व गोष्टींवर उपाय आहे. माझी भूमिका नेहमी स्पष्ट राहिली आहे, असेही ते म्हणाले.
हा माझ्या दृष्टीने फार कठीण प्रश्न नव्हता, असेही ते म्हणाले. आपण पक्षाने दलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली आहे. सुजयच्या बाबतीत निर्णय करण्याचा प्रश्न आला त्यावेळी पक्षांतर्गत काही गोष्टी घडल्या, ज्यावर मी बोलू इच्छित नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ, मला धनुष्य उचलावे लागणार नाही
अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे नक्की जिंकणार आहेत. सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ आहे. मला धनुष्य उचलावे लागणार नाही. सध्या माझी भूमिका सध्या वडिलांची आहे आणि वडील म्हणून माझा विश्वास आहे की, तो नक्की निवडून येईल, असा विश्वासही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सुजयसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता. सुजयने काम केलं आहे. त्याचा लोकसंग्रह आहे. सुजय माझा मुलगा आहे, म्हणून मी उमेदवारी मागत नव्हतो. त्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, म्हणून त्याला आघाडीकडून उमेदवारी मिळणे आवश्यक होते, असे विखे पाटील यावेळी म्हणाले.
अहमदनगरची जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 3 वेळा पराभव झाला आहे. त्यामुळं ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी होती, परंतु असं घडलं नाही, असेही ते म्हणाले.  औरंगाबाद जागेची अदलाबदल झाली असती, असेही म्हणाले. सुजय करता मी मागणी करणं चुकीचं ठरलं असतं. रावेरची जागा सोडली, औरंगाबादमध्ये अजूनही गोंधळाची स्थिती आहे.
अहमदनगरमध्ये समोरच्या पक्षाकडे सक्षम उमेदवारही नव्हता. राष्ट्रवादीने 9 ते 10 उमेदवार तपासून नकार दिला होता. अशा स्थितीत आपली एक जागा वाढावी असा विचार पक्षनेतृत्वाकडून होणे गरजेचे आहे, मात्र तसे झाले नाही, असेही ते म्हणाले.
आज सुजयचे आजोबा नाहीत नातवाचे लाड करायला
आज सुजयचे आजोबा नाहीत नातवाचे लाड करायला. सुजयलाही नातू म्हणून आश्वासन द्यायला हवं होतं, असा टोलाही त्यांनी यावेळी शरद पवार यांना लगावला. सुजयने राष्ट्रवादीत जावं यासाठी चर्चा झाली, मात्र पवारसाहेबांची तयारी नव्हती. ज्या पक्षाच्या नेत्याच्या मनात आपल्याबद्दल एवढा रोष आहे, तिथे जाऊन आत्महत्या करावी लागली असती, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.  त्यामुळे सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय योग्यच होता. त्याला भाजपने सन्मानाने बोलावले. मुलगा पुढं जातोय याचं समाधान आहे, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Embed widget