एक्स्प्लोर

भिवंडीतील टोरेंट कंपनीकडून कोणावरही अन्याय सहन केला जाणार नाही : मुख्यमंत्री

शहरातील नागरिकांना टोरेंटकडून त्रास होत आहे. पण ज्यांनी टोरेंट आणले, तेच आता शिव्या देत आहेत, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. टोरेंटकडून कोणत्याही नागरिकावर होणारा अन्याय, गुन्हे आणि छळ सहन केला जाणार नाही.

भिवंडी : भिवंडीतील टोरेंट कंपनीकडून कोणावरही अन्याय सहन केला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. खासदार कपिल पाटील यांच्या मागणीवरुन टोरेंटबाबत विशेष बैठक बोलावून नागरिकांना दिलासा देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कामतघर येथे आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यंत्रमाग व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, निवडणूक आटोपल्यानंतर यंत्रमागाच्या वीजपुरवठ्यासाठी 27 एचपीपर्यंत मिळणारे अनुदान 40 एचपीपर्यंत वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिकांसाठी सरकार संवेदनशील आहे. काही यंत्रमाग व्यावसायिकांनी माझी भेट घेतली. त्यात यंत्रमागावरील वीज अनुदानाची मागणी करण्यात आली. सध्या आचारसंहिता असल्यामुळे मी घोषणा करणार नाही, असे ते म्हणाले. शहरातील नागरिकांना टोरेंटकडून त्रास होत आहे. पण ज्यांनी टोरेंट आणले, तेच आता शिव्या देत आहेत, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. टोरेंटकडून कोणत्याही नागरिकावर होणारा अन्याय, गुन्हे आणि छळ सहन केला जाणार नाही.  तोडगा काढण्यासाठी निवडणूक आटोपल्यावर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. भिवंडी मतदारसंघात पाच वर्षांत तब्बल 28 हजार कोटी रुपयांचा निधी आला. शहरात कॉंक्रीट रस्ते, उड्डाणपूल, पिण्याच्या पाण्यासाठी योजना, राष्ट्रीय महामार्ग अशा योजना सुरू आहेत. पण गेल्यावेळच्या खासदारांनी एक तरी काम दाखवावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. देशात दुराचार आणि भ्रष्टाचाराची मालिका कॉंग्रेसने सुरू केली. गेल्या पाच वर्षांत आम आदमींमध्ये परिवर्तन करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले, असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. कॉंग्रेसकडून गरीबी हटावची घोषणा करण्यात आली. मात्र, केवळ चेले-चपाट्यांचीच गरीबी कॉंग्रेसने हटविली. कॉंग्रेसला 60 वर्ष जनतेच्या विकासासाठी संधी होती. त्यावेळी 72 पैसेही वाटले नाहीत. तर आता 72 हजार रुपये काय देणार, असा सवाल फडणवीस यांनी केला. कॉंग्रेसचे घोषणापत्र म्हणजे `कोंबडी विकण्याचा धंदा' अशी टीका फडणवीस यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Rahul Gandhi : पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
पीएम मोदी UPI Tax मागं घ्या,राहुल गांधींची इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मागणी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
Embed widget