एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : शरद पवार यांचा सन्मान करतो, मात्र या वयात किती खोटेपणा कराल? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक सवाल  

Chandrashekhar Bawankule : कितीही नौटंकी केली तरी महाराष्ट्र याला कंटाळला आहे. राज्याला विकास हवा आहे. मात्र मविआ संविधानाचा अपमान करत असल्याचा घाणघात चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबईशरद पवार यांचा सन्मान मी करतो, पण त्यांनी या वयात खोटारडेपणा करू नये. पराभव झाला तर स्वीकारायला हवा होता. जनतेला पुन्हा कनफ्युज करण्याचं आणि अपयश लपवण्याच काम ते करत आहेत. विधानसभेत प्रचंड मोठा पराभव करत जनतेने त्यांना नाकारलं. म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामुळे हे सारं करत आहेत. जाणीवपूर्वक महाराष्ट्र पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर दोष देऊन अपयश लापवण्याचे काम करत आहेत. मात्र, कितीही नौटंकी केली तरी महाराष्ट्र याला कंटाळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला विकास हवा आहे. मात्र मविआ संविधानाचा अपमान करत असल्याचा घाणघात करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) विरोधकांवर सडकून टीका केली आहे. 

विधानसभेला आलेले अपयश लपवण्याचे काम शरद पवार करत आहेत. राज्यात प्रथमच ईव्हीएम मशीनवर निवडणुका झाल्या नाहीत. लोकसभेत मविआला काही ठिकाणी यश आले. त्यांचे 31 खासदार निवडून आले. त्या खासदारांनी राजीनामे द्यायला हवे आहेत. आक्षेप आहे तर मग सर्वांनी राजीनामा द्या अशी टीका करत चंद्रशेखर बावनकुळेंनी मागणी केली आहे. आम्ही पण पराभव झालो, मात्र त्यातून आम्ही शिकलो आणि पुढे गेलो. या वयात किती खोटेपणा कराल, असा सवालही त्यांनी शरद पवार यांना केला आहे. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

 "शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 15 तर 79 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून येतात. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं पण निकाल अनुकूल लागला नाही. ईव्हीएमबाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, त्यामुळं यावर आताच बोलता येणार नाही. महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मतं कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत. ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे. पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत, असंही पवार यांनी सांगितलं. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, निवडणूक प्रक्रिया संपली आहे. मारकडवाडी इथं बंदी घालण्याचं कारण काय? त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की त्या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पराभव झाला म्हणून नाराज व्हायचं नाही. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडी सोबत पुढे जायचं.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..
'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..
Uttam Jankar : माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य
माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य
WTC Final Scenario : ॲडलेड कसोटी हरल्यानंतर टीम इंडिया फायनलमधून जाणार बाहेर? समजून घ्या संपूर्ण समीकरण
ॲडलेड कसोटी हरल्यानंतर टीम इंडिया फायनलमधून जाणार बाहेर? समजून घ्या संपूर्ण समीकरण
Beed: बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळेRahul Narwekar Vidhan Sabha : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी ?Karnataka Marathi Mahamelava: मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारची परवानगी नाहीSharad Pawar Markadwadi :  शरद पवारांसह राहुल गांधीही मारकडवाडी ग्रामस्थांची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..
'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..
Uttam Jankar : माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य
माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य
WTC Final Scenario : ॲडलेड कसोटी हरल्यानंतर टीम इंडिया फायनलमधून जाणार बाहेर? समजून घ्या संपूर्ण समीकरण
ॲडलेड कसोटी हरल्यानंतर टीम इंडिया फायनलमधून जाणार बाहेर? समजून घ्या संपूर्ण समीकरण
Beed: बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
Rahul Narwekar: मंत्रि‍पदाची इच्छा अधुरीच राहिली,  राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, मुंबईतून आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
मंत्रि‍पदाची इच्छा अधुरीच, राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी; मुंबईतील 'या' नेत्याची मंत्रिपदासाठी चर्चा?
Nashik News : नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
Kirit Somaiya : महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
Embed widget