एक्स्प्लोर

चांदिवली विधानसभा मतदारसंघ | नसीम खान यांच्यासमोर यंदा तगडे आव्हान

मुस्लिम उमेदवार दिल्यास याचा मोठा फटका नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे. परंतु या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा नसला तरी नसीम खान यांचा देखील एक मोठा मतदार आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभेला होणारी एकतर्फी निवडणूक यंदा मात्र प्रचंड चुरशीची होणार हे नक्की.

मुंबई उपनगरामधील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ आहे. सध्या या ठिकाणी काँग्रेसचे मोहम्मद आरिफ नसीम खान हे विद्यमान आमदार आहेत तर भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. 3 लाख 78 हजार मतदार असलेल्या या चांदिवली विधानसभा क्षेत्रात उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतदार हे प्रत्येक एक लाखांपर्यंत आहे. याचा मोठा फायदा आमदार नसीम खान यांना दर निवडणुकीला होत होता. त्यात शिवसेना भाजप वेगवेगळे लढल्याने या विधानसभेत नसीम खान हे सहज निवडून येत होते. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती झाल्याचे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवार ही जागा सहज जिंकू शकतो. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे हे या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेने देखील ही जागा जिंकायची असा निश्चिय केला आहे. त्यासाठीच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे मुत्सद्दी आमदार अनिल परब यांना या विधानसभेचे विभाग प्रमुखपद देण्यात आले आहे. नुकत्याच  चांदिवली येथे पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यात अनिल परब यांनी या विधानसभेवर भगवा फडकविण्याची खुद्द उद्धव ठाकरे यांची इच्छा  असल्याचे सांगितले होते. शिवसेनेत अंतर्गत बंडाळी झाली नाही आणि भाजपने जर शिवसेनेला पुरेपूर मदत केली तर नसीम खान यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. परंतु भाजप युवा मोर्चाचे  राष्ट्रीय सदस्य शुभ्रांशू दीक्षित देखील गेली दोन वर्षे या विधानसभेत निवडणूक लढविण्याचा दृष्टीने जनसंपर्क वाढवत आहेत. भाजपने तिकीट न दिल्यास ते अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यातच आधी एमआयएममध्ये असलेले काही उमेदवार आता नव्याने वंचित बहुजन आघाडीमधून लढण्याची तयारी करीत आहेत. याचा फटका मात्र विद्यमान आमदार नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे. चांदिवली विधानसभेचा इतिहास 2009 साली या विधानसभेतून काँग्रेसचे नसीम खान आणि तेव्हा मनसेत असलेले आणि आता शिवसेनेत असलेले दिलीप लांडे यांच्यात थेट लढत झाली होती. यात नसीम खान 82 हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर 2014 साली दिलीप लांडे यांनी घाटकोपर पश्चिममधून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या मतदार संघातून शिवसेनेतर्फे संतोष सिंग यांनी निवडणूक लढवली होती. तर मनसेचे ईश्वर तायडे उमेदवार होते. त्यामुळे नसीम खान यांनी तब्बल 73 हजारांपेक्षा जास्त मते मिळवून विजय मिळविला होता. सध्या स्थिती आकड्यांची गणिते 337 बूथ असलेल्या चांदिवली मतदार संघात मुस्लिम, उत्तर भारतीय आणि मराठी मतदार हा प्रत्येकी एक लाखाच्या जवळपास आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार असलेल्या पूनम महाजन यांना या मतदार संघातून 1,00998 मते तर आघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त यांना 73,743 इतकी मते मिळाली होती. त्यामुळे चांदिवलीमधून नक्कीच युतीने चांगली बाजी मारली होती. सध्या या विधानसभा क्षेत्रातील नऊ नगरसेवकांपैकी सहा शिवसेनेचे, दोन भाजपचे तर एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. अशात या वेळी बहुजन वंचित आघाडी ने या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिल्यास याचा मोठा फटका नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे. परंतु या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा नसला तरी नसीम खान यांचा देखील एक मोठा मतदार आहे. त्यामुळे  प्रत्येक विधानसभेला होणारी एकतर्फी निवडणूक यंदा मात्र प्रचंड चुरशीची होणार हे नक्की. जाणून घ्या या मतदारसंघाविषयी

महत्त्वाच्या बातम्या

Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
Someshwar Sugar Factory Election: ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget