एक्स्प्लोर

Jayant Patil: भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही; जयंत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य

Jayant Patil speech in Sangli: अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावा, सत्तेसाठी एकेक आमदार महत्वाचा, सत्ता आली नाही तर कुत्र पण विचारणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

सांगली: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी  ताकद लावली तर महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल. राज्यात आपले सरकार आल्यावर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, आता  काय कुणाला घाई नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. 

पलूस कडेगाव मतदार संघात विकास भरपूर झाला आहे. तरीदेखील आणखी काही विकास काम असतील तरी सांगा असे आमदार कदम  म्हणतात. त्यामुळे कर्णाचा दुसरा अवतार म्हणजे विश्वजीत कदम असेही जयंत पाटील यांनी म्हटलेय.  महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा उमेदवार या महाराष्ट्रात निवडून  आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. 

राजकारण थोडंसं बाजूला ठेव लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र  थोडसं मोठं मन ठेवा, भांड्याला भांडण लागत असेल तर ते थोडसं बाजूला ठेवा  आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. आज सत्ता येण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. जर सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. बंडखोरी करण्यासाठी आज जी लोकं मोठ्याने बोलत आहेत ती  माणसं परत आवाज काढणार नाहीत, निवांत घरात जाऊन बसतील, रिटायर होतील. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत मन अडकवू नका. आता सरकार येण्यासाठी तुम्हा सगळ्यांनी प्रयत्न करा असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

जयंत पाटलांची भाजपवर जोरदार टीका

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिल्लीला खुश करण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी हे करायला लागले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात आहेत. मात्र, हे मान वर करुन विचारू शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवायला लागली आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.  70 हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांना मंत्रिमंडळात घेऊन बसलेत. ज्या नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता त्या नवाब मलिकांना आणि नवाब मलिकांच्या कन्येला या लोकांनी मित्र पक्षाची तिकीट देऊन भारतीय जनता पक्षाच्या पॅनलममध्ये घेतलेले आहे.  म्हणजे भारतीय जनता पक्ष हा आडवाणींचा आणि अटलबिहारी वाजपेयींचा राहिलेला नाही. महाराष्ट्रातील ही भ्रष्ट राजवट दूर करायची असेल पक्षाची फोडाफोडी थांबायचे असेल तर एकसंधपणाने काम केले पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

राहुल गांधी मुंबईत विधानसभेचा नरेटिव्ह सेट करणार, 5 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीणबाबत महत्त्वाचा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget