एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Election Result : लोकसभेपूर्वी ईशान्य भारतात भाजपला मोठं यश, अरुणाचल प्रदेशमध्ये दणदणीत विजय, सिक्कीममध्ये कुणाला सत्ता?

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपनं पुन्हा एकदा सत्ता या राज्यात मिळवली आहे.

इटानगर : अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Election Result) आणि सिक्कीम विधानसभा (Sikkim Assembly Election Result) निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) एकहाती सत्ता मिळवली आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं (SKM) सलग दुसऱ्यांदा विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु ठेवली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. बातमी लिहून प्रसिद्धकरेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार भाजपनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे. 

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत.आतापर्यंत एकूण 50 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपनं त्यामध्ये 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर, ते अजून  5 जागांवर आघाडीवर आहेत. याशिवाय नॅशनल पीपल्स पार्टीनं 4 जागांवर विजय मिळवला असून ते 1 जागेवर आघाडीवर आहेत. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं 2 जागांवर विजय मिळवला आहे. 

अजित पवारांच्या नेतृ्त्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुणाचल प्रदेशात खातं उघडलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नसला तरी ते एका जागेवरुन  आघाडीवर आहेत. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे तर दोन ठिकाणी ते आघाडीवर आहेत.   

सिक्कीममध्ये सत्ताधाऱ्यांना पुन्हा कौल

सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं सत्ता मिळवली आहे. सिक्कीम राज्यात विधानसभेच्या  32 जागा आहेत. यापैकी सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं 21 जागांवर विजय मिळवला आहे. तर, 10 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ 1 जागा मिळवता आली आहे.

भाजपकडून जल्लोष सुरु

अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकतर्फी सत्ता मिळवल्यानंतर प्रदेश भाजपनं जल्लोष सुरु केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवतं आणि नाचत आनंद साजरा केला.  

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप 10 जागांवर बिनविरोध

अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तारुढ भाजपला मतदानापूर्वीच मोठं यश मिळालं होतं. भाजपनं अरुणाचल प्रदेशमध्ये 60 जागांवर उमेदवार दिले होते. तर, काँग्रेसनं फक्त 19 जागांवर उमेदवार दिले होते. भाजपला अरुणाचल प्रदेशमध्ये 10 जागांवर बिनविरोध विजय मिळाला होता.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला

लोकसभा निवडणुकीची आणि आंध्रप्रदेशसह ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार आहे.  या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस तर ओडिशामध्ये बीजेडी सत्तेत आहे. 

संबंधित बातम्या : 

Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंना आता कळालं असेल, मी किती ताकदीचा उमेदवार होतो, एक्झिट पोलनंतर बजरंग सोनावणेंनी डिवचलं

फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं आत्मचिंतन करावं : एकनाथ खडसे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Ajit Pawar Meeting : अजित दादांचं 'ते' वक्तव्य; रोहित पवारांची कबुलीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget