एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुजय विखेंच्या प्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी, मुख्यमंत्री नाराज
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अहमदनगरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. भाजपचे अहमदनगर मतदार संघाचे खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी सुजय विखे यांच्या प्रवेशाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घोषणाबाजी केली आहे.
मुंबई : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अहमदनगरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. भाजपचे अहमदनगर मतदार संघाचे खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी सुजय विखे यांच्या प्रवेशाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घोषणाबाजी केली आहे.
भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आज संसदीय समितीची बैठकीची पार पडणार आहे. या बैठकीत भाजपाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली.
यादरम्यान दिलीप गांधी यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करायला सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्री नाराज झाले असल्याची माहिती आहे.
दिलीप गांधी हे अहमदनगरचे विद्यमान खासदार आहेत. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यास दिलीप गांधी यांचा पत्ता कट होईल. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सुजय विखे पाटील यांना पहिले पाच वर्ष काम करु द्यावं आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असल्याने विखे पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुजय विखे 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शिवाय अहमदनगर मतदार संघासाठी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेशाविरोधात करत घोषणाबाजी केली आहे.
सुजय विखेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाला कार्यकर्त्यांचा विरोध | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement