एक्स्प्लोर

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव

जोगेश्वरी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल (शाळा) बंद करण्याच्या निर्णयावर पालकांनी काळजी बाळगून मनसे नेत्यांशी संपर्क साधला असता, मनसे नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला शाळांमध्ये सुरुवात झाली असतानाच मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं विद्यार्थ्यांना दाखले घेऊन जाण्याचे सांगितल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील जोगेश्वरी पश्चिम परिसरात सिटी इंटरनॅशनल शाळा (School) अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या 600 विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मुलांच्या भविष्याच्या काळजीने भीतीच्या वातावरण पसरले आहे. तर, मनसेनं (MNS) याची दखल घेत शाळेत धाव घेतली. 

जोगेश्वरी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल (शाळा) बंद करण्याच्या निर्णयावर पालकांनी काळजी बाळगून मनसे नेत्यांशी संपर्क साधला असता, मनसे नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाईंकडून शाळा बंद होऊ देणार नाही, असा म्हणत शाळा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. ओशिवरा परिसरातील ही शाळा, सिटी इंटरनॅशनल स्कूल नावाने मागील 25 वर्षापासून सुरू आहे, येथील शाळेत 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळा भाडे तत्त्वावर असल्यामुळे जागा मालकाकडून महिन्याचे भाडे 35 लाख रुपयांच्या जागेवर आता 50 लाख रुपये भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या भाडेवाढीला विरोध करत शाळा प्रशासनाने चक्क शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शाळेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. 

शाळा प्रशासनाला हे भाडं परवडत नसल्यामुळे शाळा प्रशासनाने शाळा बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याचे निर्णय घेतल्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा बंद करण्याची माहिती मिळतच मनसेकडून शाळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. शाळा प्रशासनाकडून जर शाळा बंद करण्याची भूमिका ठाम राहिली आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वार्षिक नुकसान झालं तर शाळेविरोधात मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या शिष्टमंडळाकडून आज शाळा व्यवस्थापकांसोबत भेट घेऊन चर्चा करण्यात आली. 

शिक्षण विभागाने दखल घेण्याची गरज

दरम्यान, मागील पंचवीस वर्षापासून सिटी इंटरनॅशनल स्कूल जोगेश्वरी पश्चिम ओशिवर परिसरात सुरू आहे. शाळा प्रशासनाचा या अचानक बंद करण्याचा निर्णयाच्या विरोधात पालकांनी एकवटले आहेत. त्यात, शिक्षण विभागाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 

हेही वाचा

नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget