एक्स्प्लोर

उपमुख्यमंत्री पद आणि 13 मंत्रिपदं-भाजपकडून शिवसेनेला 'ऑफर'

भाजपकडून शिवसेनेला 1 उपमुख्यमंत्रिपदासह 13 मंत्रिपदांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रीपद आणि गृह खातं यावर कोणतीही चर्चा होणार नसल्याचं स्पष्टं करत, भाजपनं आता चर्चेचा चेंडू या प्रस्तावाद्वारे शिवसेनेच्या कोर्टात ढकलला आहे. दरम्यान, भाजपद्वारे विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली.

मुंबई: एकीकडे मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपावरून शिवसेना अडून बसली असताना, भाजपनं आता शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार, मुख्यमंत्रिपदासह २६ मंत्रिपदं स्वत:साठी ठेवत, शिवसेनेला एक उपमुख्यमंत्रिपद आणि 13 अन्य मंत्रिपदं देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री पद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती देण्यात येणार नाहीत हे भाजपनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आज भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदार आणि नेते मंडळींनी विधीमंडळात येऊन देवेंद्र फडणवीस यांची गटनेते म्हणून निवड केली. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार हे स्पष्ट झालं आहे. विधीमंडळ नेता निवडीनंतर आता शिवसेनेचा रागरंग बघून देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचे नेते या नात्यानं सत्तास्थापनेचा दावा सादर करू शकतील.

VIDEO | सरकार लवकर स्थापन होणे गरजेचं, शिवसेनेने अवास्तव मागणी करु नये : रामदास आठवले 

गेल्या 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप सर्वाधिक 105 (नंतर आलेल्या 5 आमदारांसह 110) आमदारांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र, सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या 144 आमदारांची संख्या स्वबळावर मिळवण्यात भाजपला यश आले नाही. दरम्यान, निवडून आलेल्या 56 आणि नंतर सोबत आलेले 5 आमदार अशा 61 आमदारांमुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत आपला आक्रमक बाणा दाखवून देत, "भाजपच्या अडचणी दरवेळी समजून घेता येणार नाहीत", असा इशारा दिला होता. सेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाची वेळोवेळी आठवण गेल्या काही दिवसांत भाजपला करून दिली आहे. मात्र, खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीच्या वाटपाचा कोणताही फॉर्म्यूला ठरला नसल्याचं सांगितल्यानं, शिवसेना चांगलीच संतापली आहे. यामुळेच, काल भाजप-सेनेदरम्यान होणारी संयुक्त बैठकही रद्द करावी लागली. त्यापार्श्वभूमीवर, भाजपनं आज शिवसेनेला हा प्रस्ताव दिला आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. भाजपच्या ताठर भूमिकेमुळे शिवसेनेत खदखद असून त्यातच, भाजप खासदार संजय काकडे यांनी सेनेचे ४५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केल्याने, शिवसेनेच्या गोटात संताप आहे. भाजपच्या ताज्या प्रस्तावानंतर शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Embed widget