एक्स्प्लोर

Ameet Satam : मुंबईचा महापौर महायुतीचा होणार, कोणतीही रस्सीखेच नाही, एकनाथ शिंदेंबाबत अमित साटम काय म्हणाले?

Amit Satam : मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर विराजमान होईल, असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं आहे. महायुतीला मुंबईत 118 जागा मिळाल्या आहेत.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला 118 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागांवर यश मिळालं आहे. महायुतीच्या विजयानंतर मुंबईचा महापौर कोणाचा होणार? भाजपचा की शिवसेनेचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत महायुतीत कोणतीही रस्सीखेच नाही, महापौर युतीचा होईल, असं म्हटलं आहे.  

भाजपच्या मुंबईतील निवडून आलेल्या नगरसेवकांनी श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी श्री श्री रविशंकर यांनी मुंबई शहराला हॅपी सिटी केले पाहिजे त्यादृष्टीने मार्गदर्शन केलं. मुंबई शहराची सुरक्षा अबाधित ठेवण्याबाबत श्री श्री रविशंकर यांनी मार्गदर्शन केलं. 
 
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आमच्यात रस्सीखेच वगैरे काही नाही. महायुतीचा महापौर विराजमान होईल, असंही साटम यांनी म्हटलं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होईल. विरोधकांकडून  महापौरपदासाठी फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम केले जात आहे, असं अमित साटम् म्हणाले. 

भाजप आणि शिवसेना आमचे एकमेकांमध्ये चांगले कोऑर्डिनेशन आहे. तशा पद्धतीने आम्ही समोर जाऊ, असं अमित साटम म्हणाले.  
 
शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर पदासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. मुंबईचा महापौर भाजपचा होऊ नये, असं संजय राऊत म्हणाले होते. अमित साटम यांनी संजय राऊत हे महाराष्ट्रातील राजकारणातील एनसी आहेत म्हणजेच नाॅन कॉग्निजेबल आहेत, असं म्हटलं.

एकनाथ शिंदेंमुळे भाजपमध्ये नाराजी नसल्याचं देखील अमित साटम यांनी म्हटलं. कोणीही कोणता दबाव आणत नाही. 
फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून पसरवलं जातंय.  विरोधकांनी प्रचारात भूलथापा मारल्या आता पण भूलथापा मारत आहेत. त्यांच्या हाती भोपळा लागणार आहे, असं अमित साटम म्हणाले. 

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला काठावरील बहुमत मिळालेलं आहे. महायुतीला मुंबईत 118 जागांवर विजय मिळाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं नाही, त्यामुळं महापौर कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ थांबावं लागेल. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget