Bihar Election : बिहारमध्ये पुन्हा NDA चे सरकार, जनतेचा भाजपला कौल; पहिल्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर, तेजस्वी यादवांना किती टक्के मतदान?
Bihar Assembly Election Update : भाजप प्रणित एनडीसमोर तेजस्वी यादव आणि जनसुराज्यच्या प्रशांत किशोर यांचे आव्हान आहे. या दोन्ही नेत्यांनी सर्वाधिक जागा लढवल्या आहेत.
LIVE

Background
Bihar Assembly Election Update : बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. दोन्ही टप्प्यात मिळून एकूण 243 जागांसाठी मतदान पार पडलं असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 64.66 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यासाठीही चुसशीनं मतदान झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे बिहारच्या सत्तेची चावी राष्ट्रीय जनता दल प्रणित महागठबंधनकडे जाणार की भाजप-जदयू सत्ता कायम ठेवणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलने143 जागा लढवल्या आहेत. त्याचवेळी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने 168 ठिकाणी उमेदवार उतवरले आहेत
Bihar Assembly Election Update : बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. त्यामध्ये 64.66 टक्के मतदारांना मतदानाचा हक्क बजावला.
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला पार पडलं. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांसाठी घेण्यात आलं. बिहार निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 122 जागांसाठी 1,302 उमेदवार रिंगणात होते. बिहार निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
NDA Seat Distribution Details : एनडीए जागावाटपाचा तपशील
भाजप (BJP) – 101 जागा
जदयू (JDU) – 101 जागा
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा
Mahagathbandhan Seat Distribution Details : महागठबंधन जागावाटपाचा तपशील
राष्ट्रीय जनता दल (RJD) — 143 जागा
काँग्रेस (INC) — 61 जागा
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI ML) - 20 जागा
विकसनशील इंसान पार्टी (VIP) — 12 जागा
Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल
एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243
राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79
भारतीय जनता पक्ष (BJP) – 78
जनता दल (युनायटेड) – JD(U) – 45
काँग्रेस (Congress) – 19
CPI (Marxist–Leninist) Liberation – 12
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4
CPI – 2
CPI (M) – 2
AIMIM – 1
अपक्ष आमदार (Independent MLA) – 1
Bihar Election Exit Poll : एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचे, निकाल वेगळा येईल; काँग्रेसचा विश्वास
भागलपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अजित शर्मा म्हणाले की, "मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोण जिंकत आहे हे कोण सांगू शकणार नाही. एनडीए सरकार स्थापन होत आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जनता निर्णय घेते. बिहारमधील वातावरण असे आहे की सरकार महाआघाडी, इंडिया आघाडी द्वारे स्थापन केले जाईल. यावेळी बिहारचा विकास होईल. एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचे आहेत. जनता भाजपला कंटाळली आहे."
Bihar Exit Poll: नितीश कुमार यांच्या 20 ते 25 जागा वाढणार
बिहार विधानसभा निवडणुकीत गत 2020 मध्ये नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाने केवळ 43 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 74 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यंदा 2025 च्या निवडणुकीत Matrize-IANS एक्झिट पोलनुसार जदयूला 65 ते 75 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. म्हणजेच गत निवडणुकीपेक्षा 20 ते 30 जागा अधिक जिंकण्याचा अंदाज आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला 52 ते 57 जागा मिळू शकतात. म्हणजेच, गत निवडणुकीपेक्षा 10 ते 15 जागा अधिक आहेत. त्यामुळे, नितीश कुमारांचे पारडे जड असल्याचं पाहायला मिळत आहे.




















