एक्स्प्लोर

Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएची बल्ले बल्ले, तेजस्वी यादवांचा सुपडासाफ, सर्वच एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Bihar Election Exit Poll Result 2025 : गतनिवडणुकीच्या तुलनेत यंदा बिहारमध्ये मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा फटका कुणाला बसतोय हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

Bihar Exit Poll : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आणि सत्तेच्या चाव्या कुणाकडे याचा फैसला मतपेठीत बंद झाला. 14 नोव्हेंबर रोजी याचा निकाल लागणार असून सगळ्याच पक्षांची, त्यांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अशात आता एक्झिट पोलचे (Bihar Exit Poll) आकडे समोर आले आहेत. त्यामध्ये सर्वच एक्झिट पोलनी (Poll Of Polls Bihar) भाजप प्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार अशी शक्यता वर्तवली आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला शंभरीही गाठता येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बिहारच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 64 टक्के तर दुसऱ्या टप्प्यात 67.66 टक्के इतकं मतदान झाल्याची माहिती आहे. एकूण किती मतदान झालं याची अधिकृत आकडेवारी अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केली नाही. पण गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे त्याचा फटका कुणाला बसणार हे आता 14 नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.

Bihar Election Exit Poll Result 2025 : एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगतेय?

MATRIZE-IANS Exit Poll Bihar : मॅट्रीज आयएएनएस एक्झिट पोलनुसार कुणाला किती जागा?

MATRIZE-IANS पोलनुसार, भाजपप्रणित एनडीएला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एनडीए - 147-167

महागठबंधन - 70-90

इतर - 2-6

Chanakya Exit Poll Bihar : चाणक्य एक्झिट पोलनुसार, महागठबंधन शंभर जागा पार करणार

चाणक्य एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये पु्न्हा एकदा भाजपप्रणित एनडीएला सत्ता मिळणार आहे. तर महागठबंधनला शंभरच्या आसपास जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एनडीए - 130-138

महागठबंधन - 100-108

इतर - 3-5

Poll Diary Exit Poll Bihar : पोल डायरीच्या अंदाजानुसार एनडीएची सत्ता, दोनशेपेक्षा जास्त जागा

पोल डायरीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये एनडीए दोनशेच्या पारही जाऊ शकते. तर तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला 32 ते 49 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एनडीए - 184-209

महागठबंधन - 32-49

इतर - 1-5

Praja Poll Analytics Exit Poll Bihar : प्रजा पोलनुसार एनडीएला पूर्ण बहुमत

प्रजा पोलच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, एनडीएला 186 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला 50 जागा मिळण्याची शक्यता आहे.

एनडीए - 186

महागठबंधन - 50

इतर - 7

Polstrat Exit Poll Bihar : पोलस्ट्राटनुसार एनडीएला स्पष्ट बहुमत, महागठबंधनला मोठा धक्का

पोलस्ट्राटच्या अंदाजानुसार, एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार असून 133 ते 148 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एनडीए - 133-148

महागठबंधन - 87-102

इतर - 3-5

TIF Research Exit Poll Bihar : टीआयएफ रीसर्चनुसार, बिहारमध्ये भाजप-एनडीए दीडशे पार

टीआयएफ रीसर्च एक्झिट पोलनुसार, भाजप प्रणित एनडीएला दीडशेहून जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला 145 ते 163 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला 76 ते 95 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एनडीए - 145-163

महागठबंधन - 76-95

इतर - 0-1

JVC Exit Poll Bihar : बिहारमध्ये एनडीए दीडशे जागा जिंकणार

जेव्हीसी एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, एनडीए 135 ते 150 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधन शंभरच्या आसपास जागा जिंकू शकते असं म्हटलं आहे.

एनडीए - 135-150

महागठबंधन - 88-103

इतर - 3-6

Poll Of Polls Exit Poll Bihar : एनडीएची पावणे दोनशे जागांकडे वाटचाल

बिहारमध्ये आतापर्यंत अनेक पोल समोर आले आहेत. सर्वच पोलच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये सत्तेची चावी पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार, बिहारमध्ये एनडीए 150 ते 170 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला फक्त 68 ते 80 जागा जिंकता येतील अशी शक्यता आहे. इतरांना दोन ते सहा जागा मिळतील. त्यामध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला दोन ते सहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एनडीए - 150-170

महागठबंधन - 68-80

इतर - 2-6

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Embed widget